Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजिंक्यन व्युमेन्स फौंडेशनकडून महिलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि दांडिया गरबा कार्यक्रम संपन्न

अजिंक्यन व्युमेन्स फौंडेशनकडून महिलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि दांडिया गरबा कार्यक्रम संपन्न 


: महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत लुटला गरबा दांडियाच्या कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद                                            

सांगली ९  ऑक्टोबर २०२२ :- अजिंक्यन व्युमेन्स फौंडेशनकडून महिलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि दांडिया गरबा कार्यक्रमाचे आययोजन करण्यात आले होते. अजिंक्यनच्या अध्यक्षा मंजिरी गाडगीळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत गरबा दांडियाच्या कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद लुटला.



अजिंक्यन व्युमेन्स फौंडेशनकडून महिलांसाठी मनोरंजनात्मक आणि आनंद देणाऱ्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन दिपायन लॉनला करण्यात आले होते. या कार्यक्रमास महिला बालकल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे पाटील, नगरसेविका आणि भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा स्वाती शिंदे, नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांच्यासह अजिंक्यनच्या पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महिलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत सुप्रिया पिसे हिच्या मुरगुंडा वेशभूषेला पहिला, स्वप्नाली भट यांच्या केडो वेशभूषेला दुसरा, सुस्मिता कुलकर्णी यांच्या वेस्ट टू बेस्ट या वेशभूषेला तिसरा तर निकिता पाटील यांची आदिवासी वेशभूषा तर दीपाली कुंभार यांच्या बानो वेशभूषेला उत्तेजनार्थ म्हणून घोषित करून पारितोषिके देण्यात आली. परीक्षक म्हणून स्मिता चितळे , सानिका प्राणी, सुजाता कुलकर्णी आणि निशा जाधव यांनी काम पाहिले. अजिंक्यनच्या संचालिका रिटा शहा, निमिषा कल्याणी, निर्मला शेलार, वर्षा पोळ यासह संजोजन समितीच्या उज्वला चाफळकर, पूजा चाफळकर, स्मिता घेवारे, राणी यदवादे, अस्मिता पत्की यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन प्रसिद्ध निवेदिका प्रियांका कार्लेकर कुलकर्णी यांनी केले. बऱ्याच महिन्यांनी महिलांसाठी मंजिरी गाडगीळ यांनी एक प्रेरणादायी आणि प्रोत्साहन तसेच उत्साहवर्धक कार्यक्रम आयोजित केल्यामुळे महिलांनी सुद्धा मंजिरी गाडगीळ यांचे आभार मानले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.