Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नगररचनाची खाबुगिरी—भाग ४

नगररचनाची खाबुगिरी—भाग ४


सुनावणीचा निकाल, अहवाल प्रलंबित अतिरिक्त आयुक्तांच्या नावेही लाचेची मागणी

सांगली : नगररचनामधील संबंधित अधिकारी, कमर्चाऱ्यांच्या सांगण्यानुसार आयुब पटेल याने तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे अड. कुलकणीर् यांच्या जागेबाबत पुन्हा तक्रार केली. त्या तक्रारीनुसार अतिरिक्त आयुक्तांकडे सुनावणी घेण्यात आली. त्या सुनावणीस तक्रारदार पटेल हजर राहिला नाही. तरीही त्या तक्रारीवर अतिरिक्त आयुक्तांनी अद्याप सुनावणीचा निकाल किंवा अहवाल दिलेला नाही. त्यानंतर अड. कुलकणीर् यांना अतिरिक्त आयुक्त श्री. खोसे यांना लाच द्यावी लागेल असा निरोप देण्यात आला. 

मात्र लाचेचा आकडा सांगितला नाही. त्यानंतर नवीन आयुक्त रूजू झाले. त्यानंतर नगररचनाच्या संबंधित अधिकारी, कमर्चाऱ्यांनी पटेल याला कुलकणीर् यांच्या जागेबाबत तक्रार करण्यासह आत्मदहनाचा इशारा देण्यास सुचवले आहे. त्यानुसार पटेल याने पुन्हा अड. कुलकणीर् यांच्या जागेबाबत तक्रार अजर् दिला आहे. त्यानंतर अड. कुलकणीर् यांनी केलेल्या तक्रारीत अतिरिक्त आयुक्त खोसे, श्री. झगडे, श्री. डोळे, श्री. बन्ने, श्री. मंगळवारे, काशिनाथ पाटील, श्री. कदम यांचे रहाणीमान, हातातील घड्याळे, वापरातील महागडे मोबाईल, बंगले, गाड्या याची चौकशी करून त्यांचे कायदेशीर, बेकायदेशीर आथिर्क स्त्रोत याचीही चौकशी करावी. तसेच त्रयस्थ व्यक्तींच्या नावे असलेली स्थावर, जंगम मालमत्तेचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अड. कुलकणीर् यांनी केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.