Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजितराव घोरपडे विद्यालयातील नाविन्यपूर्ण 75 उपक्रमांची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड बुकात नोंद

अजितराव घोरपडे विद्यालयातील नाविन्यपूर्ण 75 उपक्रमांची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड बुकात नोंद


सांगलीतील पहिल्या ISO मानांकित शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कळंबीया अजितराव घोरपडे विद्यालयात नाविन्यपूर्ण 75 नवोपक्रम व उपक्रमाची नोंद इंटरनेशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झालेली आहे. कळंब ता. मिरज येथील सतत 10 बीघा गेली 12 वर्ष 100% निकाल असणा-या व स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय या उपक्रमात जिल्ला पुरस्कार प्राप्त अजितराव घोरपडे विद्यालयामध्ये सम उपक्रम नवोपक्रम होत असतात यावर्षी विद्यालयाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त विश्वविक्रम नोंद होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेले होती. 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालाव नाविन्यपूर्ण उपक्रम व नवोपक्रम राबवून विश्वविक्रम करण्याचा संकला केला होता. या विद्यालयाने गेले वर्षभर विविध उपक्रम घेऊन लोकसहभागातून मॉडेल शाळा निर्माण केलेली आहे.

व याची दखल शिक्षण विभागाने घेतलेले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी ही यांची दखल घेऊन त्यांनी शाळेतील या उपक्रमाची माहिती त्यांच्या सर्व समाज माध्यम फेसबुक, इंस्टाग्राम, व्टिटर, त्याच्या पेज वर शेअर करून प्रसिद दिलेली होती. या शाळेतील सर्व 750 विद्यार्थ्यांच्या सहभागाने व पालकांच्या सहकार्यातून 75 नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून नवा विक्रम करण्याचा संकल्प या शाळेच्या प्रशासनाने घेतलेला होता. या नाविन्यपूर्ण 75 उपक्रमामध्ये योगा, सूर्यनमस्कार, 750 विद्यार्थ्याचे साहित्य कवायत, मराठी, हिंदी, इग्रजी या विषयांचे 750 विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला, पोस्टर प्रदर्शन, मेहंदी, रंगमरण, उत्कृष्ठ स्वाक्षरी स्पर्धा, मेहंदी प्रदर्शन, पाढे निर्मिती कार्यशाळा, लेझीम पथक, झांझ पथक, 750 विद्याथ्यांचे मॅरेथॉन स्पर्धा, सर्व विद्यार्थ्याचे तिरंगा फेस पेंटिंग, स्मरणशक्ती स्पर्धा, मुहावरे स्पर्धा, म्हणी स्पर्धा, शेरोशायरी सादरीकरण, चारोळी, सादरीकरण. बोधकथा निर्मिती व सादरीकरण, सर्व 750 विद्यार्थी पोस्ट कार्ड संदेश स्पर्धा, स्वातंत्र्य सैनिक, व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, आदर्श विद्यार्थी सत्कार, पथनाट्य सादरीकरण, तिरंगा सायकल रैली, क्रांतिकारकांचे चित्र फोटो प्रदर्शन, बॉल पेंटिंग प्रदर्शन, निसर्ग चित्रे प्रदर्शन, वर्ग सजावट स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन व अपूर्व विज्ञान मेळावा, अटल टिंकरींग साहित्य निर्मिती प्रदर्शन, शैक्षणिक साहित्य मॉडेल निर्मिती, इंग्रजी, मराठी, हिंदी, घोषवाक्य स्पर्धा, इंग्रजी समृद्धीकरण कार्यक्रम, पुस्तक परिचय व पुस्तक प्रदर्शन, व अशा प्रकारे, 75 उपक्रम प्रत्येकी 75 विद्यार्थ्याच्या सहभागाने संपन्न करण्यात येत आहे. 

750 विद्यार्थ्यांच्या सहभागातून विविध वर्ल्ड बुकामध्ये नोंद करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेली होती. इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आलेली होती. व ह्या सर्व उपक्रम व नवोपक्रमाचे फोटो व्हीडीओ, डॉक्युमेंट, वर्ल्ड रेकॉर्डसाठी पाठविण्यात आले होते. व त्याप्रमाणे इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होऊन त्याचे प्रमाणपत्र विद्यालयास प्राप्त झालेली आहे. शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्रामध्ये या स्वरूपाचे पहिलेच रेकॉर्ड या विद्यालयाने केलेले आहे.


या सर्व उपक्रमांमध्ये शिक्षण प्रसारक मंडळ कळंबी अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी, च्या विद्यार्थ्यांचे सर्व पालक, ग्रामस्थ, नागरीक, सर्वांच्या सहकार्यातून हा उपक्रम संपन्न झाला होता. या विश्वविक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक डी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विश्वविक्रमी समिती स्थापन करण्यात आली होती. डी. एन. पाटील मुख्याध्यापक अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी ता. मिरज जि. सांगलीसांगली

1) सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिले ISO 9001-2015 मानांकित विद्यालय,

2) स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय जिल्ह्यात तीस शाळांमध्ये निवड 

3) एकाच विद्यालयात दोन शिक्षकांना महाराष्ट्र शासनाचे आदर्श राज्य पुरस्कार मुख्याध्यापक • श्री. डी. एन. पाटील आणि कलाशिक्षक श्री. आदमअली मुजावर. 

4) इ.10 वी चा सलग 12 वर्षे 100% निकालाची परंपरा.

5) विद्यालयात सर्व 12 वर्गात 40 इंची LED TV, ई-लर्निंग सॉफ्टवेअर.

6) विद्यालयात प्रोजेक्टर, सोलर सिस्टिम, R.O. वॉटर फिल्टर, CCTV कॅमेरे ची सुविधा

7) जिल्ह्यातील पहिली मुलींसाठी स्वतंत्र चेजिंग रूम, सॅनेटरी नॅपकिन डिस्ट्रॉय मशिनची सुविधा 

8) पटसंख्येत भरीव वाढ विद्यार्थीसंख्या 420 वरून 758 पर्यंत पोहचली विद्यालयात कळंबी गावातील 247 विद्यार्थी व जवळपासच्या दहा गावातील 511 विद्यार्थी असे एकूण 758 विद्यार्थी विद्यालयात शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी संख्येत दर वर्षी वाढ.

9) जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि DIECPD ने घोषित केलेले रोल मॉडेल शाळा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 100 पेक्षा जास्त शाळा व 2000 हून अधिक शिक्षकांची आदर्श विद्यालयास भेट देऊन शाळेची गुणवत्ता व व्यवस्थापनाची माहिती घेतली.

10) विद्यालयाची महाराष्ट्र शासनाच्या सन 2018-19 कोल्हापूर येथिल शिक्षणाची वारी मध्ये सांगली जिल्ह्यातून एकमेव निवड

11) विद्यालयातील NMMS स्कॉलरशीप परीक्षेमध्ये आतापर्यंत 60 विद्यार्थी गुणवत्ता यादीत. 28,80,000/- रूपये विद्यार्थ्यांना स्कॉलशीप मिळाली. तसेच सारथी स्कॉलरशीपमध्ये 9 विद्यार्थी गुणवत्ता यादीत. 3,45,600/- रूपये विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप मिळाली.

12) आम्ही शाळेसाठी झोकून देऊन काम करतो. - रंगकाम, प्लंबिंग, लाईट फिटिंग, वेल्डिंग, चित्र पेंटिंग, बागकाम, सुतारकाम, स्वच्छता, सजावट इत्यादी कामे आम्ही सर्व शिक्षक करतो. म्हणून आम्ही इतर शाळेपेक्षा वेगळे आहोत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.