Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जगातील 'सर्वात घाणेरडा व्यक्ती'चा मृत्यू; तब्बल 50 वर्षांपासून केली नव्हती अंघोळ

जगातील 'सर्वात घाणेरडा व्यक्ती'चा मृत्यू; तब्बल 50 वर्षांपासून केली नव्हती अंघोळ


जगातील 'डर्टीस्ट मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इराणमधील अमाऊ हाजी यांचा अखेर मृत्यू झाला आहे. 94 वर्षीय अमाऊ हाजी यांनी जवळपास 60 वर्षांपासून आंघोळ केली नव्हती. द गार्डियनच्या वृत्तानुसार, इराणमधील देजगाह गावात त्यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला.

इराणच्यावृत्तानुसार, हाजी एकटेच राहायचे आणि आजारी पडण्याच्या भीतीने त्यांनी 60 वर्ष आंघोळ केली नव्हती. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांच्या गावातील लोकांनी जबरदस्तीने त्यांना आंघोळ करायला भाग पाडले. त्यावेळी हाजी यांचे नवीन फोटो व्हायरल झाले होते. फोटो पाहून लोकं आश्चर्य व्यक्त करत होते आणि खरोखरच हाजी यांनी 60 वर्ष आंघोळ न केल्याचा रेकॉर्ड खरा ठरला.

हाजी एका झोपडीत राहायचे आणि तारुण्यात आलेल्या वाईट अनुभवांमुळे त्यांनी आंघोळ न करण्याचा निर्णय घेतला होता. आजारी पडण्याच्या भीतीने 60 वर्षे त्यांनी आंघोळ केली नाही. तेहरान टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात दावा केला होती की, हाजी हे रस्त्याच्या कडेला मेलेल्या जनावरांना खायचे आणि जनावरांच्या विष्ठेने भरलेल्या पाईपमधून धूम्रपान करायचे. स्वच्छतेमुळे ते आजारी पडत असल्याच्या त्यांचा समज आहे. सोशल मीडियावरील काही फोटोंमध्ये ते एकत्र अनेक सिगारेट ओढतानाही दिसत आहेत. त्यांच्या या अनोख्या रेकॉर्डमुळे त्यांच्या जीवनाचे वर्णन करणारा 'द स्ट्रेंज लाइफ ऑफ अमाऊ हाजी' हा लघुपट 2013 मध्ये तयार करण्यात आला होता.


अमाऊ जिवंत असताना त्यांना कुठलाच आजार नसल्याचे निष्पन्न झाले. ज्याप्रकारे त्यांची जीवनशैली होती ते पाहून अनेक संशोधकांनाही आश्चर्य व्यक्त केले होते. त्यांच्या मते ते पूर्णपणे तंदुरुस्त होते. देजगावमध्ये राहणारे स्थानिकही त्यांच्या जीवनशैलीने ते खूप प्रभावित झाले होते. कारण ते कधीच आजारी पडले नव्हते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.