Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, 3.5 रिश्टर स्केलवर तीव्रता

गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, 3.5 रिश्टर स्केलवर तीव्रता


गुजरातमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडून मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी होती. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी 10.26 वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची खोली जमिनीखाली 7 किमी होती.

सुरतपासून 61 किमी अंतरावर भूकंप नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार हा भूकंप गुजरातमधील सुरतपासून 61 किमी अंतरावर झाला आहे. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. कच्छ भागातही भूकंपाचे धक्के. यावर्षी ऑगस्ट महिन्यातही गुजरातमधील कच्छ भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता 3.2 इतकी मोजली गेली होती. गांधीनगरच्या सिस्मिक रिसर्च इन्स्टिट्यूटने सांगितले होते की, हा भूकंप कच्छमध्ये संध्याकाळी 7.43 च्या सुमारास झाला. या दरम्यान कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नव्हते.

ऑगस्ट महिन्यात कच्छमध्ये दोन वेळा भूकंपाचे धक्के

गुजरातच्या कच्छमध्ये ऑगस्ट महिन्यात दोन वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. यापूर्वी 3 ऑगस्ट रोजी गुजरातमधील कच्छमध्ये भूकंप झाला होता. त्यानंतर त्याची तीव्रता 3.6 इतकी मोजली गेली. त्यानंतर दुपारच्या दरम्यान पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर भूकंपाचा केंद्रबिंदू गुजरातमधील रापर शहरापासून 13 किमी दक्षिण-नैऋत्य होता


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.