Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महारोजगार मेळावा सांगली येथे 15 ऑक्टोबरला

महारोजगार मेळावा सांगली येथे 15 ऑक्टोबरला


सांगली, दि. 10,  : खाजगी  क्षेत्रात लहान, मध्यम व मोठ्या कारखान्यांना तसेच खाजगी हॉस्पीटल यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी व समाजात दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारीची समस्या दूर करण्याच्या दृष्टीकोनातून महारोजगार मेळाव्याचे  शनिवार, दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माधवनगर रोड, सांगली येथे ऑफलाईन आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज.बा.करीम यांनी केले आहे.


या महारोजगार मेळाव्यात शिकाऊ उमेदवार व नियमित पदांची भरती सांगली जिल्ह्यातील खाजगी कंपन्या व हॉस्पीटल्स करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने सिध्दीविनायक ॲटोमोबाईल्स मिरज, एपिक यार्न्स प्रा.लि. पेठ-इस्लामपूर, स्वीट कन्फेक्शनरी प्रा. लि. मिरज, रोटाडाईन टूल्स प्रा. लि. मिरज, एक्सल पेन्सील्स लि. मिरज, जेसन फौन्ड्री प्रा. लि. कुपवाड, माई इंडस्ट्रीज मिरज, वेस्टर्न प्रेसिकास्ट प्रा.लि. कुपवाड, सह्याद्री मोटार्स प्रा.लि., महाबळ मेटल प्रा.लि. मिरज, कामधेनू ॲग्रोव्हेट कसबे डिग्रज, बालाजी ॲटो सर्व्हिस सांगली, जगदिश आर्यन ॲण्ड स्टील प्रा. लि. मिरज, जगदिश इंजिनिअरींग वर्क्स मिरज, उष:काल अभिनव स्पेशालिटी हॉस्पीटल सांगली, अर्थव इंडस्ट्रीज, सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल सांगली, किर्लोस्कर ब्रदर्स लि. किर्लोस्करवाडी, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी बोर्ड विश्रामबाग सांगली, भिडे ॲण्ड सन्स प्रा.लि. पेन्टागॉन इंडस्ट्रीज प्रा.लि. सांगली, सिध्दीविनायक इंडस्ट्रीज कुपवाड, जय रेन्युवाबळे  इनर्जी प्रा.लि., श्री दत्त इंजिनिअरींग, फाईन मॅन्युफॅक्चरींग इंडस्ट्रीज मिरज, स्कायलार्क प्रेसीटेक प्रा.लि., डीप इंडस्ट्रीज कुपवाड, टायसन इंडस्ट्रीज मिरज, हिंदुस्थान गारमेंट बामनोळी, पेसिशियन इंजिनिअरींग वर्क्स लि. कुपवाड, एल.आय.सी. ऑफ इंडिया शाखा इस्लामपूर इत्यादी कंपन्यांमध्ये इयत्ता 9 वी पास, एसएससी, एचएससी, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, आयटीआय, डिप्लोमा, बी.ई. इत्यादी शैक्षणिक पात्रतेची 31 उद्योजकांकडील एकूण 1 हजार 622 पदे भरण्यात येणार आहेत.


या मेळाव्यामध्ये www.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करून अप्लॉय करावे. तसेच  बायोडाटा व कागदपत्रासह उमेदवारांनी महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. करीम यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.