Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम 144 लागू

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम 144 लागू


सांगली, दि. 07,  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब  संयुक्त पूर्व परीक्षा-2022 दि. 8 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. सांगली जिल्हा केंद्रावरती 41 उपकेंद्रावर एकूण 12 हजार 300 उमेदवार या परिक्षेसाठी बसलेले आहेत. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने कलम 144 आदेश लागू केले आहेत. अशी माहिती केंद्र प्रमुख तथा ‍निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांनी दिली.

या परीक्षेसाठी प्रशासनाकडून 41 उपकेंद्रावर 41 उपकेंद्रप्रमुख, 177 पर्यवेक्षक, 605 समवेक्षक, 90 मदतनीस लिपीक, 82 शिपाई कर्मचारी व 55 वाहनचालक यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय 11 समन्वय अधिकारी व दोन भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यामार्फत परिक्षेच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाणार आहे. या परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण दि. 6 ऑक्टोबर 2022 रोजी बालगंधर्व नाट्यमंदीर, मिरज येथे घेण्यात आले असल्याचे केंद्र प्रमुख तथा ‍निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांनी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.