Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

घरगुती नळ जोडणीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दरमहा 13 हजार प्रमाणे नळ जोडणी देण्याची कार्यवाही करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

घरगुती नळ जोडणीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दरमहा 13 हजार प्रमाणे नळ जोडणी देण्याची कार्यवाही करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी


सांगली, दि. 06,  :  जिल्ह्यातील 4 लाख 57 हजार 879 कुटुंबापैकी 3 लाख 755 कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे. उर्वरीत 1 लाख 57 हजार 124 कुटुंबांना घरगुती नळ जोडणी देण्याबाबत ऑक्टोबर 2023 अखेर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दरमहा 13 हजार प्रमाणे नळ जोडणी देण्याची कार्यवाही करावी. तसेच आराखड्यामधील आठ रद्द योजनांचे ठराव प्राप्त करून घेवून शासनाची मंजूरी घेवून रद्द करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात  जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता  समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी,  ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कदम, जलजीवन मिशन चे प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव,  जि. प. उप कार्यकारी अभियंता डी. जे. सोनावणे, भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी  यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता उपस्थित होते.


जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, 714 अंदाजपत्रकांपैकी 705 अंदाजपत्रके तयार करण्यात आली असून यापैकी 682 अंदाजपत्रकांची निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. उर्वरीत 23 अंदाजपत्रके पुढील बैठकीपूर्वी सादर करावीत. मिरज तालुक्यातील गुंडेवाडी व जत तालुक्यातील करेवाडी (ती) या दोन गावांच्या बाबतीत स्थानिक  अंतर्गत वाद असल्याने संबंधित गावातील सरपंच, ग्रामसेवक, पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष व सचिव यांची बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. स्त्रोत बळकटीकरणांमध्ये भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने सूचविलेल्या 16 गावातील 111 रिचार्ज शाफ्टची कार्यकारी अभियंता ग्रामिण पाणीपुरवठा यांनी पाहणी करून अहवाल सादर करावा व तालुकानिहाय निविदा कार्यवाही करण्याच्या सूचना वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण यांना दिल्या.

सुधारणात्मक पुन:जोडणी अंतर्गत दरडोई निकषात बसणाऱ्या तीन योजना, दरडोई निकषापेक्षा जास्त असलेल्या दोन योजना व फेर प्रशासकीय मान्यतेसाठी सादर केलेल्या सहा योजनांना मान्यता देण्यात आली. या बैठकीमध्ये एकूण पाच योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तसेच पाच कोटी किंमतीपेक्षा कमी किंमत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील मौजे आगळगाव या योजनेसही मान्यता देण्यात आली. 

यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कदम यांनी जिल्ह्यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या योजनांची सविस्तर माहिती सादर केली. तसेच निविदा प्रक्रिया सुरु असलेल्या योजना, प्रस्तावित असलेल्या योजना तसेच शासनाकडून प्राप्त झालेल्या विविध सूचनांचे यावेळी सादरीकरण केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.