Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बूस्टर डोस घेतला का? NTAGI अहवालातून धक्कादायक बाब समोर

बूस्टर डोस घेतला का? NTAGI अहवालातून धक्कादायक बाब समोर


मुंबई : कोरोनाचा धोका आता पहिल्याप्रमाणे दिसून येत नाहीये. धोका काही प्रमाणात कमी झाल्याने जर तुम्ही बूस्टर डोस घेणं टाळत असाल तर असं करू नका. कारण गेल्या 8 महिन्यांत, कोरोनामुळे देशभरातील रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या 90% लोकांनी बूस्टर डोस घेतला नसल्याची बाब समोर आली आहे.

नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) चे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा यांनी बुधवारी सांगितलं की, यामुळेच गेल्या दोन दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक 33% वाढ झालीये. सोमवारी देशभरात 5439 नवे रुग्ण आढळले, तर मंगळवारी हा आकडा 7231 वर पोहोचला. म्हणूनच बूस्टर डोस घेणं खूप महत्वाचं आहे.

अँटीबॉडीज 6-8 महिन्यांत कमी होतात

डॉ. अरोरा म्हणाले की, लसीचा एकच डोस घेतल्यानंतर 6 ते 8 महिन्यांनंतरच शरीरात अँटीबॉडीज कमी होऊ लागतात. यामुळे व्हायरससमोर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत केवळ 20% पात्र असलेल्या व्यक्तींनी लसीचा तिसरा डोस घेतला आहे.

कोरोनाचा संसर्ग अजूनही कायम आहे

अरोरा पुढे सांगतात की, कोरोना धोका अजूनही पुर्णपणे टळलेला नाही. व्हायरसचा प्रसारही त्याच पद्धतीने होताना दिसतोय. आपल्याला त्याचं गंभीर स्वरूप दिसत नाही आणि मृत्यूचं प्रमाण खूपच कमी झाले आहे. मात्र आपण कोरोना प्रोटोकॉलचं पालन करण्यात आराम करू नये. तरीही सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.

18-59 वयोगटातील केवळ 12% लोकांनी घेतला डोस

आकडेवारीनुसार, 18 ते 59 वयोगटातील 77 कोटी लोक बूस्टर डोस घेऊ शकतात, परंतु त्यापैकी केवळ 12% लोकांनी हा डोस घेतला आहे. त्याच वेळी, 168 दशलक्ष फ्रंटलाइन वर्कर, आरोग्य सेवा कर्मचारी आणि 60 वर्षे आणि त्यावरील लोक प्रिस्क्रिप्शन डोससाठी पात्र आहेत. यापैकी केवळ 35% लोकांना लसीचा हा डोस घेतला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.