Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मि लक्ष्मी मार्केट बोलतेय......

 मि लक्ष्मी मार्केट बोलतेय......


माझा जन्म 1932 सालात झाला. मला घडविण्यात मिरजेचे पटवर्धन सरकार, चिवटे, बेडेकर, जाधव यांचा सिंहाचा वाटा. शहराच्या मध्यभागी मि दिमाखात ऊभी राहीले. अख्या महाराष्ट्रात एकमेव माझ्या सारखी मिच होते व आहे.

सांगली जिल्ह्याची  शान आहे असे मला पाहणारे म्हणतात. मला आज जवळ जवळ  ९० वर्षे होत आहेत. या काळात कित्येक राजकीय, सामाजीक स्थितंतरे मि पाहीली. हाजारो लोक रोज माझ्या समोरुन ये जा करतात. कोनतेही राजकीय, सामाजीक सभा, आंदोलन, सर्व जातीधर्माचे उत्सव माझ्या परिसरात झाल्या शिवाय त्या सभानां, आंदोलनाला, त्या उत्सवाला रंगच येत नाही. माझ्या वर असणार्या घडाळ्यावर मिरज तसेच सहा ते सात किलो मिटरचा परीसर चालायचे. प्रतेक तास मि सांगायचे. माझ्या भोग्या मुळे तर रोज मार्केट चालू व बंद व्हायचे, कामगारांची ड्युटी सुद्धा बदलायची. हे सर्व मि आजवर पहात आले आहे. राहिल्या त्या फक्त सुंदर आठवणी

पण आज मात्र  माझ्याकडे पाहण्यास कुणाला वेळच नाही. आज थोडस तारुण्य संपून थोडस वार्धक्याकडे झुकत आहे पण असेही समजण्याचे कारण नाही मला वार्धक्य आल. मि अजून तरुणच आहे अजून कित्तेक वर्षे मला कांहीही होणार जर माझ्याकडे वेळच्या वेळी लक्ष दिले तर याची मि खात्री देते.  मागे एकदा मला पेटवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला पण थोडक्यात निभावले. त्या वेळी परत मि एकदा महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. 2009 मध्ये तर जगप्रसिद्ध झाले.

मात्र आता कुठे माझा काठ तुटलाय, कुठे माझ्यावरील नक्षीकाम तुटलय, कौले, पत्रे , कुंभी तुटलीय, कुठेतरी गिलावा माझ्या पासून वेगळा होतोय, वेळच्या वेळी माझ्या अंगाखाद्या वरची झाडीझूडपे व पाणी न काढल्या मुळे पाणी झिरपत आहे व गिलावा ठिसूळ होऊन माझ्या पासून वेगळा होत आहे. मध्ये एकदा महाबळ व तोडकर नामक या  सामाजीक कार्यकर्त्यांच्या कडून माझी रंगरंगोटी व घड्याळ चालू ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. महाबळ तर कित्येक वर्षे रोज नित्यनेमाने माझ्या चारी कमानी विद्रुप केलेल्या स्वःता पाणी आणून खराट्याने स्वच्छ करायचे. पण त्यानां साथ मिळाली नाही.

हो पण माझ्या पदरात खाली व आजूबाजूला सर्व जातीधर्माचे व्यवसाईक आहेत. ते मात्र त्यानां मला जितक शक्य आहे तितके पाहतात, जमेल तितकी माझी झालेली मोडतोड,  दुरुस्ती, स्वच्छताही करतात. 

पण स्वःताच्या जागे पुरतेच ह....

( जेव्हढी जागा वापरतात तेव्हढ्याचे भाडे व कर सुद्धा वेळच्या वेळी भरतात )

आता मात्र माझ्या सर्व चहूबाजूनी बघण्याची वेळ माझ्या मिरजकरांच्या वर आलेली आहे. माझ्या पदरात असणार्या व्यवसाईक लोकांनी परवाच्या घटने नंतर माझ्या नावाने गेली ८० वर्षे बसवत असलेल्या गणेशाचे माझी डागडूजी सुरु झाल्या शिवाय विसर्जनच करणार नाही अशी घोषणा केली आहे . अशी निवेदने संबधीत सर्व खात्यानां व संबधीत लोकानां काल पासून देत आहेतच.

आता या बाबत सर्व मिरजेतील राजकीय पक्ष व त्यांचे नेते तसेच कार्यकर्ते, सर्व सामाजीक संघटना, सर्व उद्योजग, सर्व कामगार संघटना, सर्व जाती धर्मातील प्रतिष्ठित नागरीक, सामान्य नागरीक, तरुण, तरुणी, महीला, सर्व प्रिंट मिडिया व सर्व इलेक्ट्रॉनीक मिडीया या विषयात सर्व अभिनिवेश बाजूला ठेऊन माझ्या साठी एकत्र येऊन संबधीत यंत्रणेला जाग आणतील का.... ? 

माझी गेलेली लया मला परत आणून देतील का....? 


मला मिरजेची शान म्हणून अजून तुमच्या सोबत दिमाखात जगायचे आहे हो.... 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.