" पडळकरांचा चिल्लरपणा "
राज्य विधिमंडळातील विधान परिषदेसारख्या जेष्ठ सभागृहाचे सदस्य व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ए बी पी माझा या वृत्त वाहिनीशी बोलतांना एक आक्षेपार्ह वलग्ना केली त्याबाबत हा माझा आक्षेप आपल्यासमोर सादर करतो. पडळकर साहेब, सर्वप्रथम आपणास आदरपूर्वक नमस्कार. आणि नमस्कार वगैरे ही आमच्या पक्षाने आम्हाला लावून दिलेली शिस्त आहे. त्यामुळे हा नमस्कार प्रपंच. आता आपण मूळ मुद्यावर येऊ.
तर पडळकर साहेब, काय बोलले तुम्ही त्या टी.व्ही. च्या कॅमेऱ्यापुढे ? की पवार साहेबांच्या रेशन कार्डची चौकशी करण्यात यावी. त्यांच्या रेशन कार्डवर किती लोकांची नावे आहेत ? अशाप्रकारे चौकशी झाल्यावर पवार कुटुंबाचा खरा चेहरा समोर येईल. मग या पोस्टमधून माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की, तुम्ही खरोखर आमदारच आहे का ? अहो रेशन कार्ड तपासणी करणे हा विषयच मुळी मामलेदार कार्यालयाच्या अधिकारात येतो. आणि तुम्ही त्या कार्यालयाबाहेर बसणाऱ्या दलालासारखे प्रश्न टी व्ही समोर बोलावे ? तुम्ही विधिमंडळाचे सदस्य आहात. आणि तुमच्या तोंडून अशी दलालांची भाषा यावी ?
अहो पडळकर साहेब, रेशन कार्ड हे ऑनलाइन झालेले आहे. आणि तुम्ही ज्यांच्या रेशन कार्ड विषयी बोलताय ते शरदचंद्रजी पवार साहेब मागील ५५ वर्षापासून विधिमंडळ व संसदीय मंडळाचे सदस्य आहे. मग त्यांना स्वतःच्या रेशन कार्डविषयी काहीच माहिती नसणार आहे का ? अहो, तुम्ही अजून तुमच्या आमदारकीचे सहा महिनेही पूर्ण केले नाही. आणि त्या जगजेत्या माणसाविषयी तुमच्यासारख्या एकेकाळी क्षुल्लक असणाऱ्या मंगळसूत्र चोराने पवार कुटुंबाचा खरा चेहरा जनतेसमोर आणावा असे म्हणावे ? मी तुमच्या या वाक्याचा निषेध करतो.
तुम्ही २०१९ ला बारामतीमधून निवडणूक लढवली होती. त्यावेळेस तुम्ही तिथे काय काय पाहिले ? त्यावेळीच सर्व चौकशी करायची होती ना राव. त्यावेळी तुमचे डिपॉझिट जप्त झालं आणि तुम्ही तुमचं काळ झालेलं तोंड लपवत निघून गेलात. आता याच ठिकाणी तुम्ही संभाजी ब्रिगेड विषयी एक वाक्य बोललात की, ज्यांना जनाधार नाही अशा लोकांना सोबत घेऊन शिवसेना राजकारण करणार आहे. तर या बाबतीत मला तुम्हाला हे सांगायचे आहे की, तुमच्या भाजपचे राज्यात असलेल्या २३ खासदारांच्या विजयात संभाजी ब्रिगेडचा खारीचा नाही तर सिंहाचा वाटा आहे. आणि ही बाब माजी मुख्यमंत्री आद. उद्धवजी ठाकरे यांनी ओळखली म्हणून त्यांनी संभाजी ब्रिगेड सोबत युती करण्याचा निर्णय घेतला. आणि तुम्ही म्हणता की त्यांना काही जनाधार नाही. तुम्ही सांगा तुम्हाला काय जनाधार आहे ? अहो पुढील काळात तुम्हाला भाजपचा पक्षाधार तर सोडाच पण फडणवीस आधार सुद्धा राहणार नाही.
तुम्ही आज सत्तेत आहे. मी तुम्हाला चॅलेंज करतो, ते असे की, तुमची सत्ता राज्यात अजून सत्तावीस महिने आहे. तेव्हढ्या काळात तुम्ही या फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवून दाखवा. फडणवीस हे कोणत्याही समाजाच्या आरक्षण प्रश्नाला मुळात सोडवूच इच्छित नाही. कारण सध्या देशात असलेले अरक्षणच हे रेशीम बागेला मान्य नाही. येत्या २०२८ ला तुमचा सदाभाऊ खोत हेच फडणवीस करतील. हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. सध्या तुम्ही आमदार आहे म्हणून चार लोकं तुमच्या मागे फिरत्यात. २०२८ नंतर तुम्हाला आटपाडीमध्ये कुत्र सुद्धा विचारणार नाही. कारण आजची भाजप ही अटलजींची भाजप राहिलेली नाही. आजची भाजप ही भागवत, मोदी, शहा यांची भाजप आहे. आणि यांना आरक्षण हा शब्दच घटनेत नको आहे. त्यामुळे रेशन कार्डची चौकशी करा, आणि जनाधार नसलेल्या पक्षाला सोबत घेऊन शिवसेना राजकारण करू पहाते. अशी वलग्ना करणे आपण थांबविले पाहिजे. कारण एकतर त्या ए बी पी माझा ला लाज नाही अशा बातम्या दाखवायला. आणि तुम्हालाही लाज नाही रेशन कार्डची चौकशी करा म्हणायला. असो.
बंडू जावळे जालना
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म.रा.
जयभीम सेना म.रा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.