Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुषार हंबीरवरील हल्ल्याप्रकरणी चौघांना अटक; टोळी युद्धातून झाला होता हल्ला

तुषार हंबीरवरील हल्ल्याप्रकरणी चौघांना अटक; टोळी युद्धातून झाला होता हल्ला 


पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तुषार हंबीर (वय-३५) या अटकेतील गुन्हेगारावर हल्ला केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. बंडगार्डन पोलीसांनी ही कारवाई केली आहे. या चौघांकडून पोलिसांनी एक तलवार, चॉपर, देशी बनावटीचे पिस्तूल आणि गुन्ह्यात वापरलेले जिवंत काडतूस जप्त केले आहे.

पोलीस उपायुक्त सागर पाटील म्हणाले कि, गुप्त माहितीच्या आधारे सागर हनुमंत ओव्हाळ (22), त्याचा भाऊ, बालाजी (23), सूरज शेख (19) आणि सागर आटोळे (21) यांना अटक केली. हे सर्व हडपसर येथील आहेत. सिंहगड रोडवरील पानमळा येथील घरात ते लपून बसले होते. हे सर्व जण हंबीरच्या प्रतिस्पर्धी टोळीतील सदस्य आहेत. या दोन्ही टोळीतील सदस्य यापूर्वी अनेकदा एकमेकांविरुद्ध आले आहेत.

या हल्ल्यात सहभागी असलेल्या पाचव्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत असून या हल्ल्यामागे पूर्व वैमनस्य असल्याचे समोर आले आहे. ओव्हाळ बंधू हडपसरमधील एका टोळीचे सदस्य आहेत. सुजित वर्मा हा त्यांचा म्होरक्या होता, ज्याची 2017मध्ये हंबीर टोळीच्या सदस्यांनी हत्या केली होती. तेव्हापासून त्यांच्यातील शत्रुत्व वाढत गेले, अशी माहिती पोलीसांकडून प्राप्त झाली आहे.

सोमवारी रात्री हंबीर दाखल असलेल्या बेडपर्यंत पोहोचण्याचा हल्लेखोरांनी प्रयत्न केला. त्यांना एका पोलीस कर्मचाऱ्याने रोखले. या झटापटीत तो जखमीही झाला होता. 25 ऑगस्ट रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृहातून हंबीरला ससून रुग्णालयात हलवण्यात आले होते. सप्टेंबर 2015 मध्ये राजकीय पक्षाचा युवा-विभागाचा नेता हेमंत गायकवाड यांच्या हत्येतील कथित सहभागानंतर हंबीरला 2016 मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत ताब्यात घेण्यात आले होते. तेव्हापासून तो तुरुंगात आहे.

बंड गार्डन पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर म्हणाले कि, सागर ओव्हाळ याच्यावर मालमत्ता आणि देहविक्रय यासह पाच गुन्हे दाखल आहेत. त्याचा भाऊ बालाजी याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. इतर दोघांवरही मालमत्ता आणि देहविक्रीचे गुन्हे दाखल आहेत. पाच हल्लेखोरांना हंबीर ससून रुग्णालयात आल्याची माहिती कशी मिळाली, याबाबत डीसीपी पाटील म्हणाले, ओव्हाळ बंधू आणि त्यांचे साथीदार हंबीरच्या टोळीतील आणखी एका सदस्याच्या मागे होते. तेव्हाच त्यांच्या लक्षात आले की टोळीचा सदस्य ससून रुग्णालयात वारंवार येत होता. त्याचा पाठलाग करत असताना त्यांना समजले की हंबीरला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर त्यांनी तुषार हंबीरवर ससून रूग्णालयात जावून जीवघेणा हल्ला केला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.