Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सामूहिक शेततळे घटकासाठी अनुदानाचा लाभ घेण्याकरीता अर्ज करण्याचे आवाहन

सामूहिक शेततळे घटकासाठी अनुदानाचा लाभ घेण्याकरीता अर्ज करण्याचे आवाहन


सांगली, दि. 29,  : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सामूहिक शेततळे हा घटक फलोत्पादन पिकांसाठी संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करणे व दुष्काळी भागामध्ये फलोत्पादन पिकाच्या क्षेत्र विस्तारासाठी सिंचन सुविधा निर्माण करणे या उद्देशाने 100 टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे. या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी समूहाकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे. याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सिंचन सुविधा या घटकाखाली अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

सामूहिक शेततळे घटकासाठी आकारमाननिहाय फलोत्पादन क्षेत्र व देय अनुदान पुढीलप्रमाणे. 34 x 34 x4.70 मीटर आकारमानाच्या सामूहिक शेततळ्यासाठी 2 ते 5 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त फलोत्पादन क्षेत्राकरीता 3 लाख 39 हजार रूपये तर 24 x 24 x 4 मीटर आकारमानाच्या सामूहिक शेततळ्यासाठी 1 ते 2 हेक्टर फलोत्पादन क्षेत्राकरीता 1 लाख 75 हजार रूपये इतके अनुदान आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.