पत्रकारीता व बीए, बीक़ॉम, एमबीए, एम. कॉमसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश सुरू
पत्रकार क्षेत्राची आवड असलेल्या व या क्षेत्रात करिअर करू इच्छिणारया कोणत्याही वयातील व्यक्तींसाठी डिप्लोमा इन जर्नालिझम ( एक वर्ष) व बीए जर्नालिझम ( तीन वर्ष) अभ्यासक्रमासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश सुरू झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या असलेल्या या विद्यापीठातील अभ्यासक्रमाना केंद्रीय स्तरावरील युजीसीची मान्यता मिळालेली आहे.
किमान १२ वी उत्तीर्ण किंवा १९७५ पूर्वीची दहावी परीक्षा उत्तीर्ण असलेल्या व्यक्तीला या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. ठाणे रघुनाथ नगर येथील आनंद विश्व गुरूकुल जेष्ठ रात्र महाविद्यालयमध्ये पत्रकारीता अभ्यासक्रमाबरोबर एम.कॉम, प्रथम वर्ष कला व वाणिज्य तसेच एमबीए साठी प्रवेश सुरू झाले आहेत. विद्यापीठाने वरील अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. इच्छुक विद्यार्थ्यानी प्रवेशासाठी आकाश ढवळ ८२९१०९२५११ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत तसेच विद्यापीठाचे संकेतस्थळ www.yacmou.digitaluniversity.ac.in वर प्रवेशासाठी संपर्क साधता येईल. प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन होईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.