Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

निवारा बांधकाम कामगार संघटना.

निवारा बांधकाम कामगार संघटना. 


महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या साठी अटल घरकुल योजना प्राधान्याने व त्वरित राबविण्यात येइल.असे कामगार मंत्री सुरेशजी खाडे यांचे आश्वासन सांगलीमध्ये तारीख सात सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता कामगार मंत्री श्री सुरेश खाडे यांची   कॉ शंकर पुजारी यांनी सांगली येथे भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनाबाबत बोलताना कामगार मंत्री श्री सुरेशभाऊ खाडे यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नोंदीत बांधकाम कामगारांना घरकुले मिळवून देण्यासाठी शासनामार्फत जागा उपलब्ध करून देण्यात येईल. त्याची सुरुवात म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी  कार्यालयात 7सप्टेबरला बैठक होत आहे. त्यांनी असेही सांगितले की यापूर्वी जी घरकुले मंजूर आहेत उदा. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा 357 बेघरांचा मंजूर घर प्रकल्प व मिरज येथे गोखले यांचा 230 फ्लॅट्सचा घरप्रकलप आहे. त्याबाबत बांधकाम कामगारांच्या कागदपत्रांचे प्राधान्याने पूर्तता करण्याबाबत संबधित अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. तसेच या प्रकल्पाचे श्री गोखले बिल्डर, कामगार संघटना प्रतिनिधी व कामगार मंत्री यांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रकल्प प्रत्यक्षात लवकरच पूर्णत्वास नेला जाईल. असेही आश्वासन श्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिले.

याबाबत बोलताना कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की सध्या महाराष्ट्रात  जीवित 12 लाख नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. सध्या महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे 14 हजार कोटी रुपये कामगारांच्या विविध योजना राबविण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे प्राधान्याने महाराष्ट्रामध्ये ज्यांना राहायला स्वतःचं घर नाही अशा कामगारांना घर देण्याचे महत्त्वाचे काम शासन करू शकते.

उदाहरणार्थ सध्या ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांनी घरकुल मिळण्यासाठी प्रत्येकी दोन लाख रुपये अनुदान मिळण्याबाबत अनेक जिल्ह्यांमध्ये शेकडो अर्ज सरकारी कामगार कार्यालयामध्ये दाखल केलेले आहेत. ज्या बांधकाम कामगारांना स्वतःचे घर बांधण्यासाठी जागा नाही ती जागा उपलब्ध करून देण्याबाबत कामगार मंत्र्यांनी असे आश्वासन दिलेले आहे की. शासकीय मालकीची जमीन उपलब्ध करून  त्याबाबतचे प्रकल्प लवकरच  राबविण्यात येतील. अशी महत्त्वपूर्ण घोषणा कामगार मंत्री यांनी केलेली आहे. या घोषणेचे स्वागत महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने कामगार नेते काँग्रेस शंकर पुजारी यांनी केले आहे.शिष्टमंडळामध्ये कॉ रणजित लोंढे व कॉ सुरेश सुतार यांचाही समावेश होता. वरील चर्चेबाबतची संपूर्ण माहिती देण्यासाठी रविवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी ठीक सकाळी 11 वाजता सांगली निवारा भवन येथे डी मार्ट जवळ बांधकाम कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे तरी या महत्त्वाच्या मेळाव्यासाठी बांधकाम कामगारांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन करणारे पत्रक निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या  जनरल सेक्रेटरी प्राध्यापिका शरयू बडवे व सचिव कॉ विशाल बडवे यांनी प्रसिध्दीस दिलेले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.