महामंडळाचे महाधिवेशन भव्य दिव्यच झाले पाहिजे.. माझी भरघोस मदत राहील..
आमदार अरुणअण्णा लाड पुणे पदवीधर मतदारसंघ
थोर स्वातंत्र्य सैनिक क्रांतीअग्रणी स्व. जी. डी. बापू लाड यांचे सुपुत्र आणि पुणे पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अरुणअण्णा लाड यांची आज सांगली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन अधिवेशन तयारीची माहिती दिली. त्यांना खूप आनंद झाला. शिक्षण क्षेत्रातील अनेक गंभीर प्रश्नांची चर्चा झाली. अण्णा म्हणाले, प्राथमिक पासून उच्च शिक्षणापर्यंत शिक्षकांच्या रिक्त जागा १००% भरल्या पाहिजेत. आघाडी सरकारने यापूर्वीच आता ५०% टक्के व सहा महिन्यात राहिलेल्या ५०% शिक्षकांची रिक्त पदे रिक्त आहेत भरण्याचा निर्णय घेतला आहे. आता या सरकारने याची पूर्तता केली पाहिजे.. अधिवेशनात या वर आवाज उठवता येईल. अधिवेशन हे समस्यांना वाचा फोडण्यासाठी चांगले माध्यम आहे. अधिवेशनाच्या भव्य सभागृहाला '' क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड सभागृह '' असे नाव देण्याचा प्रस्ताव मान्य करुन अधिवेशनास भरीव आर्थिक मदत केली जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी अण्णांना अधिवेशन प्रमुख उपस्थितीचे निमंत्रण देण्यात आले. यावेळी रावसाहेब पाटील, प्रा एन.डी.बिरनाळे, प्रा. आर. एस. चोपडे, विनोद पाटोळे व प्रा. एम. एस. रजपूत उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.