विसापुरात पतीकडून पत्नीचा निघृण खून
सांगली : तासगाव तालुक्यातील विसापूर येथे घरगुती वादातून पतीने डोक्यात खोरे घालून पत्नीचा निघृण खून केला. मंगळवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. काजल बिरजू जाधव असे मृत महिलेचे नाव आहे. काजलचा खून केल्यानंतर तिचा पती बिरजू पसार झाला आहे. याबाबत तासगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू आहे.
काही वषार्पूवीर् काजलचा आळसंद येथील बिरजूशी विवाह झाला होता. त्यांना दोन मुलेही आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून सतत वाद होत होते. त्यावेळी त्यांच्यातील वाद नातेवाईकांनी मिटवले होते. त्यानंतरही त्यांच्यात वाद होतच होते. त्यामुळे काही दिवसांपूवीर् काजलच्या सासरच्या मंडळींनी तिला माहेरी विसापूर येथे सोडले होते. सोमवारी बिरजू पत्नी काजलला भेटण्यासाठी विसापूर येथे गेला होता. मंगळवारी पहाटे त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यानंतर त्याने खोऱ्याने पत्नी काजलच्या डोक्यात निघृणपणे घाव घातले. त्यात ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यानंतर बिरजू तेथून पसार झाला. घटनास्थळी तासगाव पोलिस दाखल झाले असून बिरजूचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.