कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांचा सांगली जिल्हा दौरा
सांगली, दि. 06, : राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार, दि. 6 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 8.23 वाजता सीएसएमटी मुंबई येथून महालक्ष्मी एक्सप्रेसने सांगलीकडे प्रयाण.
बुधवार, दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळी 5.22 वाजता सांगली रेल्वे स्टेशन येथे आगमन व दास बंगला, विश्रामबाग निवासस्थान सांगलीकडे प्रयाण. सकाळी 5.45 वाजता दास बंगला विश्रामबाग निवासस्थान सांगली येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता दास बंगला विश्रामबाग सांगली येथून जिल्हाधिकारी कार्यालय सांगली कडे प्रयाण. सकाळी 10.40 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आगमन. सकाळी 10.45 वाजता अटल आवास योजना शहरी / ग्रामीण अंतर्गत बांधकाम कामगारांच्या घर उभारणीकरीता जागा उपलब्ध करून देण्याबाबत बैठक. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत जनसंपर्क कार्यालय मिरज कडे प्रयाण व राखीव. दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत मिरज मतदारसंघातील ग्रामिण व शहरी भागातील उत्सव मंडळांना सदिच्छा भेटी.
गुरूवार, दि. 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता श्री. विश्र्वाज्ञा आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय शुभारंभास उपस्थिती, स्थळ - वरद मोरया अपार्टमेंट, फ्लॅट नं. जी. १, गुलॉब कॉलनी, 100 फुटी रोड, चेतना पेट्रोलपंपाजवळ, दक्षिण शिवाजीनगर, सांगली. सकाळी 11 वाजता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रदर्शन सोहळ्याचे उद्घाटन व आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ - विवेकानंद सभागृह ज्युबिली इंग्रजी कन्या शाळा, मिरज. सकाळी 11.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत जनसंपर्क कार्यालय मिरज. दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत राखीव. सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत मिरज मतदार संघातील ग्रामिण व शहरी भागातील गणेश उत्सव मंडळांना सदिच्छा भेट.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.