शाईपेन,, लेखणी......।
... दत्तात्रय पांडुरंग मानुगडे,, ग्रामीण कथा लेखक...।
..... हे शाईचे पेन पहिले की मनाला फार आनंद होतो व असे सुंदर सुंदर पेन पाहिले की डोळ्याचे पारणे फिटते. पूर्वी शाळेला होतो तेव्हा टाक दौत बरु अशा वस्तू असायच्या पण पुढे पुढे टाक व दौत जावूनशाईपेन आले. त्यावेळी अनेक कंपन्या पेपर क्विन या नावाचा पेन बाजारात येत होता. तशा अनेक कंपन्या शाईचे पेन विक्रीसाठी काढत होत्या. सध्या तर रंगीबेरंगी बॉल पेन बाजारात पहावयास मिळतात मी लेखक असल्यामुळे शाईपेन वर माझे फार प्रेम आहे. बाजारात शाईचा पेन आला म्हणजे मी खरेदी करणारच इतकं प्रेम. शेवटी काय आहे पेन कोणताही असो लिहिण्याची प्रतिभा मोठी असली पाहिजे त्याशिवाय साहित्यनिर्मिती होत नाही हे मात्र निश्चित. मध्यंतरीच्या काळामध्ये एअर पेन कंपनीचा पेन हुबळी ऑफिस मध्ये एका क्लार्क च्या हातात मला दिसला. माझा जोडीदार रेल्वे कर्मचारी गुंडाप्पा हा हुबळी डिव्हिजन मध्ये शिपाई म्हणून काम करत होता.
क्लार्क च्या हाता मधील हिरव्या रंगाचा शाईपेन पाहून माझं मन म्हणू लागले. हा शाईपेन माझ्या मनात भरला आहे तो मला मिळाला पाहिजे म्हणून मी गुंडाप्पा जवळ आग्रह धरला व मी म्हणालो माझं लक्ष त्या शाईच्या पेन वर गेले आहे. तो क्लार्क मला पेन देईल का काहीही करून मला तो पेन फार आवडला आहे आपण त्याला पैसे देऊ. हुबळी हा भाग कर्नाटक मध्ये असल्यामुळे तेथील मूळ भाषा कन्नड आहे गुंडाप्पा ला कन्नड येत होते. माझा हट्ट पाहून तो त्या क्लार्क जवळ गेला आणि कन्नड मध्ये सांगू लागला. हा रेल्वे कर्मचारी आहे त्याने माझ्यासोबत किर्लोस्करवाडीला काम केले आहे. शिवाय तो मराठी रायटर आहे त्याला तुमचा पॅन फार आवडला आहे तो क्लार्क मनाला ठीक आहे त्याने लगेच पैसे दिल्या बरोबर मला हिरव्या रंगाचा पिल दिला. माझ्या मना ला फार आनंद झाला आणि एका क्षणात तो पेन मी आनंदाने खिशाला लावला.
इतकं प्रेम माझेपेनवरतीआहे परवा तर मी कराडला सहज गेलो असता प्रथम पेन दुकान कोठे आहे याची चौकशी करतो कराड सिटी मध्ये शालीनी बुक दुकान मी शोधून काढले. पाठीमागे एकदा याच दुकानातून शाईचा एअरमैल पेन खरेदी केला होता. तोपेन भरपूर जाड व त्या पेनला आठ नंबरची मोठी निफ दिसायला पेन बहारदार असा सध्या माझ्याजवळ शाईपेन भरपूर आहेत. मी माणसापेक्षा पेन वर पुस्तकावर अतिशय प्रेम करतो हा माझा स्वभाव आहे. बाजारामध्ये एखाद्या नवीन लेखकाचे पुस्तक आले म्हणजे खरेदी करणारच इतकं प्रेम. मला काही लेखक लोक म्हणतात तुमची शाळा कमी इतके साहित्य कोणत्या पेन ने लिहिले मी त्यांना म्हणतो कोणताही पेन असो लेखका जवळ प्रतिभा असावी लागते. तर काहीजण म्हणतात रेल्वेची बारा तासाची ड्युटी करून तुम्ही साहित्यनिर्मिती कशी करता. या सार्या प्रश्नांची उत्तरे मला द्यावी लागतात एवढे मात्र निश्चित. .
पेन मधून जिभळी च्या साह्याने काळी किंवा निळी साई उतरते त्याप्रमाणे डोक्यातील विचार पेनच्या साह्याने ऑटोमॅटिक उतरतात हा माझा अनुभव आहे. मी फक्त एकदाच लिहितो त्या साहित्यामध्ये खाडाखोड अजिबात नसते. इतका विश्वास माझा शब्दावर आहे म्हणूनच काही पुस्तकाचे लेखन मी करू शकलो. आमच्या घरामध्ये पूर्वी कोणाचाच वारसा लेखक म्हणून नाही तो माझ्याकडे कसा आला हे सुद्धा मला माहीत नाही. सातत्याने लिहित गेलो अजूनही लिहितोय हा माझा एक वेगळा आगळा छंद आहे. कधी पुरस्कारासाठी कुठेही अर्ज केला नाही पुरस्कार संस्थासुद्धा मला माहीत नाहीत. माझ्या बाबतीत वर्तमानपत्रातून व माझ्या साहित्यातून महाराष्ट्राला समजले यातच मी माझा आनंद व्यक्त करतो.
शब्द भांडवल समाजाचे आहे मी यात कुणीही नाही समाजाकडून शब्द भांडवल घेतले व साहित्याच्या रुपाने मी त्यांना परत केले आहे. लेखक होऊन होत नाही प्रतिभा व वास्तव याचा मेळ झाल्याशिवाय साहित्य निर्मिती होत नाही. हल्ली कथा कादंबरी कशी लिहायची याची कार्यशाळा निघत आहे परंतु पुढे घडलेली कथा किंवा कादंबरी त्यावेळचा परिसर कथेतील किंवा कादंबरीमध्ये येऊन गेलेली पात्रे. ही पात्रे कादंबरी किंवा कथेशी निगडीत असतात त्याच्यासाठी कार्यशाळेची काय गरज परंतु हल्ली तर कार्यशाळा निर्माण होत आहेत याचा आनंद मानू बस इतकच...।
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.