भाजपने राज ठाकरेंना घेतले तर आम्ही जागेवर बसून त्यांना बाहेर काढू - रामदास आठवले
पुणे : राज यांच्या घरी कोणी जावे याला आमचा विरोध नाही. मात्र, राज यांनी आमच्या घरी यायला आमचा विरोध आहे. भारतीय जनता पक्षाने त्यांना सोबत घेतले, तर आम्ही कुठे जाणार नाही, तर इथेच बसून त्यांना बाहेर काढू, अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजप-मनसे युतीचा प्रश्न निकाली काढला. पुणे श्रमिक पत्रकार संघाने मंगळवारी दुपारी संघाच्या सभागृहात आठवले यांच्याबरोबर वार्तालाप आयोजित केला होता. संघाचे अध्यक्ष स्वप्निल बापट, सरचिटणीस पांडुरंग सरोदे व संघाचे अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते.
आठवले म्हणाले, खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे, त्यांच्याकडे बहुमत आहे. शिंदे ठिकठिकाणी गणपती मंडळांना भेटी देत आहेत. उद्धव ठाकरे घरात बसून आहेत. दसरा मेेळावा शिंदे यांचाच होईल. उद्धव यांनी दुसरी जागा पाहावी. निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह शिंदे यांनाच मिळेल, सर्वोच्च न्यायालयाचा निकालही शिंदे यांच्या बाजूनेच लागेल, असा विश्वासही आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.
आम्ही भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार
आमची राजकीय ताकद नाही, त्यामुळे इतरांना मदत करीत असतो. आधी त्यांना केली आता यांना करीत आहोत. आम्ही भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार नाही. इतर समाजाच्या लायक व्यक्तीनाही उमेदवारी दिली जाईल, असे आठवले म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.