महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे जिल्हास्तरीय सादरीकरण पुढे ढकलले
सांगली, दि. 05, : महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे जिल्हास्तरीय सादरीकरण दि. 12 व 13 सप्टेंबर 2022 रोजी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली येथे सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होणार होते. सदर जिल्हास्तरीय सादरीकरण प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आले आहे. जिल्हास्तरीय सादरीकरणाची सुधारीत दिनांक व वेळ यथावकाश प्रसिद्ध केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज.बा. करीम यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.