महामंडळ अधिवेशनाला भरीव मदत करणार.. गांधी जयंतीदिनी होणारे महामंडळ अधिवेशन शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणार.. -डॉ. विश्वजीत कदम
सांगली दि.६: शिक्षण महर्षी डॉ. पतंगराव कदम यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाला भरीव मदत केली आहे. शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी कायम पुढाकार घेऊन सढळ हाताने मदत केली आहे. मी ही कोठे कमी पडणार नाही. माझे संपूर्ण सहकार्य राहील असे प्रतिपादन माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले व अधिवेशन व्यासपिठाचे "शिक्षण महर्षी डॉ. पतंगराव कदम शैक्षणिक व्यासपीठ"असे नामकरण करण्यास मान्यता दिली.
दि. २ ऑक्टोबर रोजी सांगलीत होणाऱ्या महामंडळ अधिवेशनाचे निमंत्रण देण्यासाठी स्वागताध्यक्ष रावसाहेब पाटील व शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.शिक्षण संस्थांच्या समस्या सुटल्या तर बहुजन समाज शिक्षण गुणवत्तायुक्त होते असेही ते म्हणाले. रावसाहेब पाटील यांनी महामंडळाच्या अधिवेशनासाठी चार ते पाच हजार संस्था प्रतिनिधी व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर सेवक व त्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून हे अधिवेशन भव्य दिव्य स्वरुपात संपन्न होणार असे सांगितले.
यावेळी कोल्हापूर विभागीय सेक्रेटरी प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी शिक्षण मंत्री म्हणून केलेले काम व सन २००० व २०११ मध्ये झालेल्या महामंडळाच्या कोल्हापूर विभागीय अधिवेशनास केलेली भरीव आर्थिक मदत व मार्गदर्शन याला उजाळा दिला.
शिष्टमंडळात कोल्हापूर विभागीय सेक्रेटरी प्रा. एन.डी.बिरनाळे, विभागीय कोषाध्यक्ष प्रा. आर. एस. चोपडे, विभागीय संघटक विनोद पाटोळे,महापालिका क्षेत्राध्यक्ष प्रा. एम. एस. रजपूत, जिल्हा संघाचे उपाध्यक्ष अरुण दांडेकर, कार्यकारीणी सदस्य संजय यादव, नागठाण्याचे संस्थाचालक पी. के. पाटील व मल्लेवाडीचे सावनकुमार दरुरे उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.