घरात खोदकाम करत असताना जोडप्याच्या हाती लागलं कोटींचं घबाड
मुंबई : आपल्या घरात करोडो रुपयांचं सोनं आहे पण आपल्याल माहितच नाही. असं घडलं तर. ब्रिटनमध्ये अशीच एक घटना घडली आहे. कोणत्याही व्यक्तीचे नशीब कधी चमकेल हे कधी सांगता येणार आहे.
घराच्या नूतनीकरणासाठी घराची तोडफोड करणाऱ्या वृद्ध दाम्पत्याला अचानक 400 वर्षे जुनी सोन्याची नाणी जमिनीत गाडलेली आढळून आली. ज्याची सध्या बाजारात किंमत 2.5 लाख पौंड म्हणजेच सुमारे 2.3 कोटी रुपये आहे. आता या सोन्याचा लिलाव करून या जोडप्याने आपले म्हातारपण चांगले जगण्याचा विचार केला आहे.
'द टाइम्स'च्या वृत्तानुसार, यूकेच्या नॉर्थ यॉर्कशायरमध्ये राहणारे हे वृद्ध जोडपे गेल्या 10 वर्षांपासून त्या घरात राहत आहेत. वृद्धापकाळामुळे त्यांचे घर अतिशय जीर्ण झाले आहे. ते घर नूतनीकरणासाठी पाडण्यात येत होते. त्यांनी स्वयंपाकघरातील फरशीचे काँक्रिट पाडण्याचा प्रयत्न केला असता कुदळ कशात तरी अडकली. रिपोर्टनुसार, सुरुवातीला जोडप्याला वाटले की तळाशी इलेक्ट्रिक केबल असू शकते. त्यांनी सावधगिरीने कुदळ वापरायला सांगितल्यावर एक मोठा डबा त्यात अडकला आणि वर आला.
जेव्हा त्या जोडप्याने तो डबा उघडला तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले, त्यात 264 सोन्याची नाणी होती. ही नाणी सुमारे 400 वर्षे जुनी होती. ब्रिटनवर राज्य करणारा राजा जेम्स पहिला आणि चार्ल्स पहिला यांची नावे त्यांच्यावर कोरलेली होती. ही नाणी 1610 ते 1727 च्या दरम्यानची होती. नाणी मिळताच पती-पत्नी आनंदाने भरून आले. विचारविनिमय केल्यानंतर त्यांनी नाण्यांचा लिलाव करून पैसे मिळवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी स्पिंक अँड सन या लिलाव संस्थेला काम दिले आहे.
अहवालानुसार, उत्खननात सापडलेल्या सोन्याच्या नाण्यांची किंमत सुमारे 2.3 कोटी रुपये आहे. या नाण्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया संस्थेतर्फे लवकरच सुरू करण्यात येणार आहे. वृद्ध जोडप्याच्या घरात सापडलेली सोन्याची नाणी ही एका प्रभावशाली व्यापारी कुटुंबाची मालमत्ता असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र, आता त्या घराचे मालक वृद्ध जोडपे आहेत. त्यामुळे त्या नाण्यांचे मालकही कायदेशीरदृष्ट्या तेच आहेत. या लिलावातून मिळालेल्या रकमेतून हे जोडपे चांगले आयुष्य जगण्याचा विचार करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.