अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याबाबत सर्वात मोठी माहिती
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत. रविवारीच ते मुंबईत दाखल झाले. आज (सोमवारी) ते लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. बाप्पाचं पूजन झाल्यानंतर अमित शाह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करतील. मुंबई मनपा निवडणुकांसाठी भाजपच्या तयारीचा आढावा घेणे हा त्यांच्या दौऱ्यामागचा मुख्य उद्देश असेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर अमित शाह हे भाजप नेत्यांशी आगामी मुंबई महापालिका आणि इतर महापालिका निवडणुकांबाबत चर्चा करणार आहेत. दरम्यान, अमित शहा मुंबईला येणार म्हणजे नक्कीच ते आगामी राजकिय गणितांची मुहूर्तमेढ रोवल्याशिवाय राहणार नाहीत असं सूचक वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं.
मनसेसोबत युती?
अमित शाहांच्या या दौऱ्यात मनसेसोबत युतीवर शिक्कामोर्तब होऊ शकतं अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे गटासोबत जागावाटप, मनसेसोबत युतीची चाचपणी, ठाकरे गटाला धोबीपछाड घालण्याची रणनीती यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. भाजपने मुंबई मनपात 115 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. मुंबई मनपासह मुंबई परिसरातल्या महापालिका तसंच राज्यातल्या इतर महापालिकांमध्येही भाजपची सत्ता आणण्याचा निर्धार भाजपने केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.