Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एकीकडे भाजपच्या मिशन बारामतीची घोषणा तर दुसरीकडे पार्थ पवार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी

एकीकडे भाजपच्या मिशन बारामतीची घोषणा तर दुसरीकडे पार्थ पवार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी


मुंबई : शिवसेनेमध्ये उफाळून आलेल्या अंतर्गत बंडागळीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली. एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांच्या पाठिंब्याने भाजपसोबत सत्तास्थापन केली आहे.

राज्याच्या राजकारणात झालेल्या या राजकीय भूकंपाचे सूत्रधार भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेच असल्याचं खुद्द एकनाथ शिंदे यांनीच विधानसभेत बोलताना मान्य केलं होत. शिंदे – फडणवीस यांनी घडवून आणलेला हा भूकंप ताजा असतानाच ही जोडगोळी आणखी काही धक्के देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात असतानाच विरोधीपक्ष नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षावर पोहोचल्याने नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

राज ठाकरे यांच्यासोबतची वाढती जवळीक चर्चेत असतानाच आता पार्थ पवार वर्षा निवासस्थानावर पोहोचल्याने राजकीय चर्चा लागल्या आहेत. मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी उपस्थिती लावत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी राज ठाकरे यांचे पुत्र अमित व एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत यांचा फोटो चर्चेचा ठरला होता. अमित ठाकरे व श्रीकांत शिंदे यांच्या फोटोची चर्चा सुरु असतानाच आता श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पार्थ पवार यांनी वर्षाला दिलेली भेट चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान, पार्थ पवार यांची ही भेट गणेशोत्सवानिमित्ताने होती त्यामागे कोणतेही राजकारण नाही असं सांगितलं जात असलं तरी यावरून राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. महाविकास आघाडी सत्तेत असताना पार्थ पवार यांनी मांडलेली भूमिका व त्यानंतर शरद पवार यांनी त्यांची केलेली तिखट कानउघाडणी चर्चेचा विषय ठरली होती. शरद पवार यांच्या त्या तिखट कान उघाडणीनंतर पार्थ पवार साईड लाईन झाल्याचं पहायला मिळालं. अशातच आता राज्यात सत्तांतर झालं असून पार्थ पवार कोणता वेगळा विचार तर करत नाहीयेत ना अशी चर्चा सुरु झाली आहे.

भाजपचे मिशन बारामती

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच बारामती दौरा केला. या दौऱ्यावेळी बावनकुळे यांनी आगामी लोकसभा निवडणुकांनंतर बारामतीवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास व्यक्त केला. बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होईल असा शब्दही बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना दिल्याने भाजप शरद पवारांना बारामतीतचं रोखण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसतंय. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.