म.गांधी वसतिगृह वाचविण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सांगली ग्रामीणचे वतीने आमरण उपोषण
जिल्हाभरातून शिक्षणासाठी सांगलीत येणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या हक्काचे म.गांधी वसतिगृह वाचविण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सांगली जिल्हा ग्रामीणचे वतीने आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली. वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या साठी राहण्याची व्यवस्था, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृह, अभ्यासिका, लाईट व्यवस्था, कचराकुंडी, पार्किंग आदींची व्यवस्था करावी.
तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहवालानुसार ही इमारत धोकादायक ठरत असेल तर नव्या इमारतीच्या बांधकामापर्यंत विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था तात्काळ करण्यात यावी आणि सध्याच्या जागेवर तात्काळ नवीन इमारतीचे काम सुरू करण्यात यावे याकरिता आजपासून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सांगली ग्रामीणचे वतीने आमरण उपोषण जिल्हाध्यक्ष ज्ञानेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.