Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीतील शेख बंधूनी साकारला किल्लीत गणपती

सांगलीतील शेख बंधूनी साकारला किल्लीत गणपती  


: गणपतीची किल्ली बनवत शेख कुटुंबाने जोपासली एकात्मता : किल्ली गणपती पाहण्यासाठी सांगलीकरांची होतेय गर्दी


सांगली  : गणेशोत्सवामध्ये अनेक नवनवीन गोष्टी आपण ऐकल्या आहेत मात्र गणरायाचे भक्त असणाऱ्या सांगलीतील शेख बंधूनी किल्ली गणपती साकारला आहे. गणपतीची किल्ली बनवत शेख कुटुंबाने सामाजिक सद्भावना कायम ठेवली आहे. शेख कुटुंबाने बनवलेला किल्ली गणपती पाहण्यासाठी सांगलीकर गर्दी करत आहेत. 

सांगलीतील मेनरोडवर शेख कुटुंबाचे एवन चावी नावाचे कुलूप किल्ली बनवण्याचा व्यवसाय आहे. वेगवेगळ्या सण उत्सवात शेख कुटुंबाकडून त्या त्या सण उत्सवाचे महत्व जोपासणाऱ्या किल्ल्या बनवल्या जातात. यापूर्वी शेख कुटुंबांनी छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर याचा छत्रपती शाहू महाराज तसेच सर्व जाती धर्माच्या बोधचिन्हांच्या प्रतिकृतीच्या किल्ल्या बनवल्या आहेत. 

 गणपती उत्सवाचे औचित साधत अकबर शेख, वाहिद शेख, अहमद शेख या शेख बंधूनी गणपतीची  किल्ली तयार केली आहे. हुबेहूब गणपती बाप्पाचा छाप असणाऱ्या किल्ल्या तयार केल्या आहेत. आतापर्यंत 100 हुन किल्य्या या शेख बंधूनी तयार केल्या असून किल्ली गणपती पाहायला शेख बंधूंच्या एवन चावी दुकानात सांगलीकर गर्दी करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.