Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ना. शंभूराजे देसाईंकडून सांगली एक्साईजचे कौतुक

ना. शंभूराजे देसाईंकडून सांगली एक्साईजचे कौतुक


तासगावमधील आढावा बैठकीत केली गांजा कारवाईची प्रशंसा


सांगली : राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराजे देसाई यांनी गुरुवारी तासगाव येथे राज्य उत्पादन शुल्कची आढावा बैठक घेतली. यामध्ये त्यांनी सांगलीच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख आणि त्यांच्या टीमने गांजावर केलेल्या कारवाईचे कौतुक केले. उत्पादन शुल्कने केलेली राज्यातील ही सवार्त मोठी कारवाई असल्याचे यावेळी ना. देसाई यांनी नमूद केले. 


मिरज तालुक्यातील शिपूर येथे एका शेतात सुमारे एक एकर परिसरात लावलेली गांजाची झाडे अधीक्षक देशमुख, मिरजेचे निरीक्षक श्री. कोळी यांच्या टीमने जप्त केली. या गांजाच्या झाडांची किंमत बाजारभावानुसार एक कोटी रूपये होते. याप्रकरणी संबंधित शेतकऱ्याला अटकही करण्यात आली. दरम्यान गुरुवारी उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराजे देसाई यांनी सांगलीच्या उत्पादन शुल्क विभागाची आढावा बैठक घेतली. सांगलीतील विभागाने आतापयर्त केलेल्या कारवाईचा आढावा घेतला. तसेच अवैध दारू विक्री, वाहतूक, निमिर्ती यावर कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या. 

अधीक्षक देशमुख आणि त्यांच्या टीमने केलेल्या कारवाईचे कौतुक करत ना. देसाई यांनी अशा कारवायांमध्ये सातत्य ठेवा अशा सूचनाही केल्या. ना. देसाई यांनी केलेल्या कौतुकामुळे अधीक्षक संध्याराणी देशमुख आणि त्यांच्या टीमवर शुभेच्छांचा वषार्व होत आहे. देशमुख या महिला असूनही त्यांनी धाडसी कारवाई केल्याबद्दल नागरिकांमधूनही त्यांचे कौतुक केले जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.