Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अहमदाबादच्या आपच्या कार्यालयावर गुजरात पोलिसांचे छापे

अहमदाबादच्या आपच्या कार्यालयावर गुजरात पोलिसांचे छापे


गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे जोर वाढत आहे. आपला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता आपचे संयोजक अरविंद केजरीवाल दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आले आहेत. ते गुजरातमध्ये दाखल होत असतानाच गुजरात पोलिसांनी अहमदाबादमधील आपच्या कार्यालयावर छापे टाकले. या कारवाईबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपवर टीका केली आहे.

आपचे संयोजक अरविंद केजरीवाल रविवारी संध्याकाळी अहमदाबादमध्ये पोहचले आहेत. ते दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. केजरीवाल अहमदाबादमध्ये दाखल झाल्यावर पक्षाचे नेते इसुदान गढवी यांनी ट्विट करत गुजरात पोलिसांनी अहमदाबादमधील आपच्या कार्यालयावर छापे टाकल्याची माहिती दिली. गुजरात पोलिसांनी आपच्या कार्यालयाची दोन तास झडती घेतली. त्यांना काहीही सापडले नाही. आम्ही परत येऊ, असे सांगत ते निघून गेले, असे ट्विट गढवी यांनी केले आहे.

आपला गुजरातमध्ये मिळत असलेल्या जनतेच्या पाठिंब्याने भाजपवाले बिथरले आहेत. आपचे वादळ आता गुजरातमध्ये दाखल झाले आहे. पक्षाला गुजरातमध्ये मजबूत जनाधार मिळत आहे. त्यामुळे भाजपवाले बिथरले असून दिल्लीनंतर आता गुजरातमध्येही त्यांनी छापे टाकायला सुरुवात केली आहे. त्यांना दिल्ली आणि गुजरातमध्ये काहीही सापडले नाही. आम्ही कट्टर इमानदार, प्रामाणिक आणि देशभक्त आहोत, असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे. गुजरातमधील निवडणुका जवळ येत आहेत. तशी भाजपची भीती वाढत आहे. अरविंद केजरीवाल आणि आपला रोखणे हेच भाजपचे लक्ष्य आहे. भाजपवाले आप आणि केजरीवाल यांना एवढे का घाबरतात, असा सवाल दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.