पी. एम किसान योजनेच्याण पात्र लाभार्थ्यां नी 7 सप्टेंबर पर्यंत ई-केवायसी पूर्ण करावी - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
- पी.एम.किसान योजनेचे हप्तेा चालु ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्या-ची e-KYC पूर्ण असणे आवश्य,क
- केंद्र शासनाकडुन e-KYC पूर्ण करण्यासाठी दि. 7 सप्टेंरबर 2022 पर्यंत अंतिम मुदत
सांगली, दि. 02, : केंद्र शासनाकडील प्रधानमंत्री किसान सन्मा न निधी योजनेअंतर्गत पी.एम. किसान पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यावची e-KYC करण्यानसाठी विशेष जनजागृती करण्यांबाबत कार्यवाही सुरू आहे. पी. एम. किसान योजनेचे वर्षासाठी दोन हजार रूपयांचे तीन हप्तेश असे एकुण वार्षिक 6 हजार रूपये शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हसणून देण्यात येत आहेत. हे हप्तेे पुढे चालु ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यागची e-KYC पूर्ण असणे आवश्योक आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यास केंद्र शासनाकडुन दि. 7 सप्टेंठबर 2022 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. तरी पी. एम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यां पैकी ज्यांिनी यापुर्वी आपली e-KYC पूर्ण केलेली नाही त्यांीनी तात्कादळ e-KYC पूर्ण करुन घ्या्वी. सदरची e-KYC पूर्ण न केलेल्या् शेतकऱ्यांना पुढील लाभ वाटप होणार नाहीत. तरी e-KYC दि. 7 सप्टेंयबर 2022 पर्यंत पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाढधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना स्वततः प्रधानमंत्री किसानच्याा अधिकृत वेबसाईटवर जाऊन वैयक्तिकरित्याय e-KYC प्रक्रिया OTP द्वारा पूर्ण करता येते. संबंधित शेतकऱ्यांनी त्यांरच्या गावातील जवळच्याक महाईसेवा केंद्र किंवा आपले सरकार केंद्रावर e-KYC करता येईल. e-KYC प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांची यादी sangli.nic.in या website वर प्रसिध्दह केली आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव सदर यादीमध्येे असेल त्यांरनी तात्काiळ e-KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे. सदर e-KYC पूर्ण न केल्यास लाभार्थ्यांयना पुढील बारावा हप्ताा वितरीत होणार नाही असे केंद्र शासनाने कळविले आहे.
सांगली जिल्ह्यात एकूण 4 लाख 36 हजार 615 पात्र लाभार्थ्यांपैकी 2 लाख 67 हजार 710 लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असून 1 लाख 68 हजार 905 लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. तालुकानिहाय लाभार्थी संख्या, एकुण ई-केवायसी झालेले लाभार्थी व ई-केवायसी प्रलंबित असणाऱ्या लाभार्थींची संख्याा अनुक्रमे पुढीलप्रमाणे. आटपाडी - 31,934, 17,764, 14,170. जत - 73,662, 48,519, 25,143. कडेगांव - 36,919, 22,859, 14,060. कवठेमहांकाळ - 30,562, 18,165, 12,397. खानापूर - 27,135, 13,909, 13,226. मिरज - 57,896, 32,897, 24,999. पलुस - 25,672, 15,665, 10,007. शिराळा - 37,919, 25,533, 12,386. तासगांव - 44,461, 27371, 17,090. वाळवा - 70,455, 45,028, 25,427.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.