Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जप्त वाहनांचा जाहीर ई-लिलाव 23 सप्टेंबरला

जप्त वाहनांचा जाहीर ई-लिलाव 23 सप्टेंबरला


सांगली, दि. 08,  : मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या दहा वाहनांचा जाहीर ई-लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली येथे दि. 23 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 2 वाजेपर्यंत ठेवण्यात आला आहे. या लिलावात सहभागी होण्यासाठी दि. 20 ते 23 सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये www.eauction.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असेल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांनी कळविले आहे.

ई-लिलावात डिलिव्हरी व्हॅन 5, ओमनी टॅक्सी 1, पॅसेंजर रिक्षा 3 व प्रायव्हेट रिक्षा 1 अशी  एकूण 10 वाहने आहेत. ही वाहने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली / सावळी येथील आवारात दि. 19 ते 23 सप्टेंबर दरम्यान पहाणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. वाहन मालकांना व वित्तदात्यांना वाहनाचा थकीत कर व इतर थकीत शासकीय शुल्क भरण्याची संधी दि. 16 सप्टेंबर 2022 पर्यंत राहील याची वाहन मालकांनी व वित्तदाऱ्यांनी नोंद घ्यावी. ई-लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच प्रांताधिकारी, तहसिलदार व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली यांच्या सुचना फलकावर जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आली आहे.

ई-लिलावात भाग घेणाऱ्या प्रत्येक इच्छुकांनी 50 हजार रूपये रक्कमेचा डी.डी.  DY RTO SANGLI या नावे अनामत रकमेचा डिमांड ड्राफ्ट व प्रति वाहन 500 रूपये विना परतावा शासकीय शुल्कासह (डिमांड ड्राफ्ट) ऑनलाईन कागदपत्रांच्या प्रति नाव नोंदणी करणे व कागदपत्रे पडताळणी व ॲप्रुअल करून घेण्यासाठी सादर करणे गरजेचे आहे. लिलावाच्या अटी व नियम दि. 19 जून 2022 पासून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली येथील नोटीस बोर्डावर सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अवलोकनार्थ उपलब्ध राहील, असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.