Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा ‘टार्गेट किलिंग’ सुरू, नाव विचारून कश्मिरी पंडितांना घातल्या गोळ्या

 जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा ‘टार्गेट किलिंग’ सुरू, नाव विचारून कश्मिरी पंडितांना घातल्या गोळ्या


जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंग सुरू झाले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होऊन 24 तास उलटत नाही तोच कश्मिरी पंडितांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. शोपियामध्ये दोन कश्मिरी पंडित बंधुंना दहशतवाद्यांनी नाव विचारून गोळ्या घातल्या. यात एकाचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे.

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये सुनील कुमार भट्ट यांचा मृत्यू झाला आहे, तर त्यांचे बंधू गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील भट्ट यांनी त्यांचे बंधू सफरचंदाच्या बागेकडे जात असताना वाटेतच त्यांना दहशतवाद्यांनी घेरले आणि नाव विचारून त्यांच्यावर धाडधाड गोळ्या झाडल्या. यात सुनील भट्ट यांचा मृत्यू झाला असून त्यांचे बंधू जखमी झाले आहेत. गोळीबार झाल्यानंतर कश्मीर पोलिसांनी परिसराला घेराव घातला असून शोधमोहीम सुरू केली आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्याभरातील टार्गेट किलिंगची ही दुसरी घटना आहे. याआधी एका बिहारी मजुराची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. बिहारच्या मधेपुरा जिह्यातील रहिवासी असलेला अमरेज हा त्याच्या भावासोबत सदुनारा गावात राहत होता. दहशतवाद्यांनी गुरुवारी मध्यरात्री घरात घुसून अमरेजवर गोळय़ा झाडल्या. यावेळी रक्ताच्या थारोळय़ात पडलेल्या अमरेजला रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारांआधीच त्याचा मृत्यू झाला

जम्मू-कश्मीरमध्ये 2017 ते 5 जुलै 2022 या पाच वर्षांत दहशतवाद्यांनी 28 बिगरकश्मिरी नागरिकांच्या हत्या केल्या. यात सर्वाधिक बिहारचे 7 मजूर मारले गेले. तसेच महाराष्ट्रातील दोन आणि झारखंडच्या एका मजुराची हत्या झाली. केंद्र सरकारने नुकतीच संसदेत ही माहिती दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.