काँग्रेसच्या आजादी गौरव पदयात्रेत सहभागी व्हा : आ. संग्राम थोपटे
सांगली, दि. ८ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त काँग्रेस पक्षाच्यावतीने उद्या दि. ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ यादरम्यान आजादी गौरव पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेस पक्षाचे निरीक्षक आमदार संग्राम थोपटे यांनी केले आहे. काँग्रेस कमिटीत आज झालेल्या बैठकीत या पदयात्रेचे नियोजन करण्यात आले. यावेळी सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि ग्रामीणचे अध्यक्ष आमदार विक्रम सावंत हे प्रामुख्याने उपस्थित होते.
आमदार थोपटे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये काँग्रेस पक्षाचे योगदान सर्वाधिक आहे. देशासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे, त्यांचे स्मरण करण्यासाठीचाही हा दिवस आहे. राष्ट्राचा देशातील सर्वांनाच अभिमान आहे. काँग्रेसने गावागावांतून आणि शहरातून आजादी गौरव पदयात्रेचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने देशाचे सार्वभौमत्व अबाधित राहावे असा संदेश लोकांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, दि. रोजी सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातून पदयात्रा निघणार आहे. त्यानंतर स्टेशन चौकात वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यासमोर दुपारी समारोप होणार आहे. काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे.
पदयात्रेचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे, दि. ९ रोजी दुपारी एक वाजता कडेगाव तालुका, पाच वाजता पलूस तालुका, दि. १० रोजी दुपारी चार वाजता वाळवा तालुका, ११ रोजी सकाळी दहा वाजता आटपाडी तालुका आणि पाच वाजता खानापूर तालुका, १२ रोजी सकाळी दहा वाजता कवठेमहांकाळ तालुका आणि सायंकाळी सहा वाजता तासगाव तालुका, दि. १३ रोजी सकाळी नऊ वाजता इस्लामपूर आणि चार वाजता शिराळा तालुका, दि. १४ रोजी सकाळी दहा वाजता उमदी, ता. जत आणि तीन वाजता जत शहर, दि. १५ रोजी सकाळी ११ वाजता मिरज तालुका आणि दुपारी एक वाजता सांगलीत स्टेशन चौकात वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याजवळ या पदयात्रेचा समारोप होणार आहे.
या बैठकीला जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील पै. नामदेवराव मोहिते, जितेश कदम, डॉ. सिकंदर जमादार, नंदकुमार कुंभार, अभिजित भोसले, मालन मोहिते, सुभाष खोत, अजित ढोले राजेंद्र शिंदे, आण्णासाहेब कोरे, डी. एम. पाटील, महावीर पाटील, जितेंद्र पाटील, सनी धोतरे, अशोकसिंग रजपूत, अविराजे शिंदे, अल्ताफ पेंढारी, मनोज नांद्रेकर, धनराज सातपुते, देशभुषन पाटील, अमित पारेकर, प्रताप चव्हाण, योगेश जाधव, भारत बोत्रा, अमोल पाटील, मौलाली वंटमुरे, अरूण पडसुळे, आयुब निशानदार, आशिष चैधरी, उदयसिंह थोरात, पैगंबर शेख, आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.