दारूची अवैध विक्री करू देण्यासाठी लाच घेताना दोन पोलीस ‘एसीबी’च्या जाळ्यात लाच स्वीकारताना पोलीसाला रंगेहात पकडले.
अकोला : दारूची अवैध विक्री करू देण्यासाठी लाच घेताना दोन पोलीस ‘एसीबी’च्या जाळ्यात देशी दारूची अवैध विक्री करू देण्यासाठी दहिहंडा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाने एक हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपनिरीक्षकासह लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. ही कारवाई चोहोट्टा बाजार येथील पोलीस चौकी बाहेरच करण्यात आली. उपनिरीक्षक भारत सखाराम सोळंके (५६) व रवी राजधर इंगळे (४३, पोलीस नाईक) अशी आरोपींची नावे आहेत.
एका तक्रारकर्त्याने २५ ऑगस्टला दिलेल्या तक्रारीनुसार, तक्रारकर्त्यास गांधीग्राम येथे अवैध देशी दारू विक्रीचा व्यवसाय करू देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली. या तक्रारीच्या पडताळणीमध्ये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा रचण्यात आला. उपनिरीक्षक भारत सखाराम सोळंकेने तक्रारदाराकडून एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई अमरावती परीक्षेत्राचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक केतन मांजरे, प्रवीणकुमार पाटील, राहुल वंजारी, नीलेश मेंहगे, सतीश किटुकले यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.