Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी झाल्यास

 एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी झाल्यास


भविष्यात भाजपात ऐतिहासिक बंडाची तयारी... “ मोदी शहा विरुध्द नितीन गडकरी -राजनाथ सिंह असा होईल सामना” ( पत्रकार हर्षल बागल यांच्या लेखनीतुन )


जर एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी झाले तर... भविष्यात नितीन गडकरी व राजनाथ सिंह हे देखील , भाजपात मोदी शहा यांच्या विरोधात बंड करु शकतात. आणी देशाच्या प्रधानमंत्री पदावर बंड करुन गडकरी बसले तर आश्चर्य वाटणार नाही. कारण सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहिली तर..

एकनाथ शिंदे गटाने म्हटलंय की... आमचा बंडखोरांचा आकडा जास्त आहे. एक तृतीयअंश आमच्या बाजुने आहेत. मुळ शिवसेना आमचीच आहे. धनुष्यबाण देखील आमचाच आहे. असे दावे न्यायलयात केलेत. आणी न्यायालयाने गेल्या दोन तारखांची केलेली चालढकल पाहता हे बंड यशस्वी होईल , असा तर्क राजकीय विश्लेषक लावताना दिसत आहेत. कारण सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायमुर्ती रमण्णा आहेत ते २६ आँगस्टला सेवानिवृत्त होत आहेत.

आणी त्यांचा ऊत्तरअधिकारी म्हणुन जे नविन नियुक्त होणारे न्यायमुर्ती आहेत ते उदय उमेश हे... सोहराबुद्दीन केस मधे अमित शहा यांचे वकील होते. त्यामुळे सध्याच्या घडीला न्यायालय कोणाच्या इशाऱ्यावर चाललय हे सागांयची गरज वाटत नाही.

असेच राहिले तर लोकशाही नव्हे तर मुळ भाजप देखील धोक्यात येईल, ..आणी , जर्मनी प्रमाणे भारतात नवे दोन हिटलर तयार होतील. हिटलरने स्वपक्षातील लोकांच्या देखील हत्या घडवुन आणल्या होत्या हे विसरुन चालणार नाही. त्यामुळे मोदी शहा जोडीचे भाजपात चाललेला एककलमी कार्यक्रम हा भविष्यातील... भाजपातील बंडाला कारणीभुत ठरु शकतो. न्यायलयाने एकनाथ शिंदे गटाच्या बाजुने निकाल दिला तर...

तोच धागा पकडत भविष्यात देशात देखील ऐतिहासिक बंड होण्याच्या मार्गावर असल्याची धुसफुस भाजपाच्या गोटात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा या जोडीने देशात-भाजपात आम्ही म्हणेल तीच खरी दिशा , असा एककलमी कार्यक्रम सुरु केलेला असल्याने भाजपा ज्यांनी वाढवली असे अनेक नेते सध्या अडगळलीला टाकले गेले.

अगदी लालकृष्ण आडवानी असतील किवां दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी., यांच्या पासुन राजनाथसिंहापर्यंत , ते अगदी काल परवा महाराष्ट्रातील एका ऊदयन्मुख राष्ट्रीय चेहरा म्हणुन ओळख मिळाली होती अशा देवेंद्र फडणविसांचे देखील डिमोशन करित , मोदी शहा जोडीेने खच्चीकरण केले. विरोधी पक्षात देखील प्रमुख नेत्यांवर सातत्याने तपास यंत्रणांचे आक्रमन केले आहे. एकुणच काय तर मोदी शहा या जोडीला महाराष्ट्राबद्दल ऐवढा द्वेष का हा संशोधणाचा प्रश्न आहे. पण खच्चीकरण करा, व समोरील व्यक्ती संपवा , अशी खुप मोठी यादी भाजपात लागेल. कारण भाजपाची जी मुळ मातृसंस्था आहे..

राष्ट्रिय स्वंय सेवक संघ यांना देखील सध्या चाललेला एककलमी राजकीय अंजेंडा मान्य नसल्याचे बोलले जाते. संघ व भाजपा विचारांनी एकनिष्ट असलेले पुर्व केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह , व सध्या आपल्या रोखठोक वक्तव्यं व रस्ते विकासाबाबतीत नो अँडजेस्टमेंटची स्पष्ट भुमिका घेणारे.. राजनाथसिंह व नितीन गडकरी , यांची गळचेपी दिसुन येत आहे.

मोदी शहा जोडीने मुळ संघाचा विचार डावलला असल्याने , गडकरी व राजनाथसिंह हे दोन बडे नेते भविष्यात एकतृतीय अंश खासदारांना सोबत घेऊ शकतात. व मुळ भाजप व कमळ आमचेच आहे असा राजकीय नाट्य घडामोडी...

राष्ट्रीय स्तरावर ऊमटल्या जाऊ शकतात. गडकरींना मानणाऱ्या खासदारांची संख्या ही नक्कीच मोदी शहा जोडीपेक्षा अधिक आहे. लोकसभा सदस्यांची संख्या ही ५५० आहे , तर राज्य सभा सदस्यांची संख्या ही २५० आहे. यातील ७५ टक्के म्हणजेच एक तृतीय अंश सदस्य हे एका रात्रीत सुरत गुहाटी प्रमाणे... गडकरी राजनाथ सिंह गटात येऊ शकतात. भाजपात आयारामांची जास्त चलती असल्याने , मुळ नेत्यांची गळचेपी झाली आहे.

त्यामुळे बंडखोरीला फक्त सुरवात झाली तर , त्याचा वणवा खुप मोठा असु शकतो. कारण स्वपक्षासह इतर पक्षांचे देखील अनेक नेते नितीन गडकरी यांचे कौतुक करताना आपण सर्वांनी पाहिले आहे. लोकशाही मध्ये विरोधक जिवंत असला पाहिजे असे अनेकवेळा गडकरी यांनी बोलुन दाखवले आहे. परुंतू... घटक पक्षांना मित्रपक्षांना सोबत घ्या , . व त्यांना संपवा , असाच कार्यक्रम मोदी शहा जोडीने हाती घेतला आहे , हे शिवसेना फुटीवरुन स्पष्टपणे दिसेल.

भाजपा सत्तेत असली तरी पुर्ण बहुमतात कधीच नव्हती. कारण मागे एकदा अटल बिहारी वाजपेयी यांनी २४ घटक पक्षांना एकत्र करित सरकार स्थापन केले होते. पण राष्ट्रिय तपास यंत्रणांचा कधीच गैरवापर केला नाही, हे तितकेच सत्य आहे. सत्ताकाळात वाजपेयी, गडकरी यांनी कधीच संघ विचारांना तिलांजली दिली नाही , हे देखील अधोरेखित करावे लागेल. तसेही संघाला मोदी शहा अमान्य आहेत.

भविष्यात जर गडकरी राजनाथसिंह पँटर्न झाला तर..

संघाची देखील देशातील या मोदी शहा विरुध्द झालेल्या बंडाला.. मुक-समंती असु शकते. तसे झाल्यास देशाच्या प्रधानमंत्री पदी नितीन गडकरी बसलेले हे पाहायला महाराष्ट्राला नक्कीच आवडेल , कारण विकासाचं व्हिजन घेऊन जाणारा एक मराठी व्यक्ती जर प्रधानमंत्री होत असेल , तर ही स्वागताहार्य राहिल.

(जसे आले तसे पाठवले, कारण मला फार आवडले)


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.