सांगली : बडोदा बॅंकेला १७ कोटींचा गंडा प्रकरणी मॅनेजरला अटक
सीएनएक्स कंपनीच्या मॅनेजरला अटक
सांगली : बँक ऑफ बडोदा या बँकेची १६ कोटी ९७ लाख रुपयांची फसवणुक करणा-या सी एन एक्स कंपनीचा एरिया मॅनेजर अजित नारायण जाधव यास अटक, करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. मिरज शहर पोलीस ठाण्यात सन २०२० मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. जाधव यांनी मार्च २०१७ ते नोव्हेंबर २०२० दरम्यान शेतक-यांचे नावे शेती माल ठेवुन त्यांचे नावावर बँक ऑफ बडोदा, शाखा-मिरज या बँकेत तारणमाल कर्ज काढुन माल परस्पर विक्री करुन शेतक-यांचे नावे काढलेले कर्ज थकीत ठेवुन कराराचा भंग करुन बैंक ऑफ बडोदा या बँकेची १६ कोटी ९७ लाख रुपयांची फसवणुक केली होती. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु आहे.
या गुन्ह्यातील सी एन एक्स (कमोडीटी नेक्स्ट) कार्पोरेशन लि. मुंबई या कंपनीचा एरिया मॅनेजर अजित नारायण जाधव यास सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेकडुन अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने दि. ५ सप्टेंबरपयर्त पोलीस कोठडी दिली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांचे मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, अमोल लोहार, इरफान पखाली, उदय घाडगे, विनोद कदम, दिपक रणखांबे यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.