Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रीय लोकअदालतीत सांगली जिल्ह्यातील ७२०२ प्रकरणे निकाली..

राष्ट्रीय लोकअदालतीत सांगली जिल्ह्यातील ७२०२ प्रकरणे निकाली..


२३ कोटी ५१ लाख २५ हजार ७३४ ची रक्कम वसूल ९० वर्षाच्या वृध्देच्या दिवाणी प्रकरणातही तडजोड 


सांगली दि. 17 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. जिल्हयातील प्रलंबित प्रकरणे, दावापूर्व प्रकरणे, स्पेशल ड्राईव्ह मध्ये, ट्राफिक ई चलन प्रकरणे ४८७४ अशी एकूण ७२०२ प्रकरणे निकाली करण्यात आली.  न्यायालयातील दिवाणी व फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे तसेच राष्ट्रीयकृत बॅंका व इतर वसुलीची प्रकरणे तसेच सहकार, कामगार, औद्योगिक, ग्राहक न्यायालयाची प्रकरणे ठेवण्यात आली होती. सांगली जिल्हयामधून एकूण रक्कम २३ कोटी ५१ लाख २५ हजार ७३४ इतक्या रक्कमेची प्रकरणे तडजोड करण्यात आली. सदर लोकन्यायालयाचे आयोजन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. अजेय राजंदेकर, , सांगली यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करणेत आले.

या दिवशी न्यायमूर्ती संदीप शिंदे व न्यायमूर्ती अभय आहुजा, न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई व पालक न्यायमूर्ती, सांगली जिल्हा यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी  मोटार अपघात दावा प्राधिकरणाच्या पॅनेलच्या ठिकाणी उपस्थित राहून, पॅनेल संदस्यासोबत  इंन्शुरन्स कंपनी व संबंधीत अर्जदार यांच्यामध्ये तडजोडीचा यशस्वी प्रयत्न केला. संबंधीत अर्जदार यांना इन्शुरन्श कंपनीकडून न्यायमूर्ती उच्च न्यायालय, मुंबई यांचेहस्ते ठरलेल्या रक्कमेचा धनादेश व पुष्पगुच्छ देण्यात आले.  तसेच कौटुंबिक न्यायालयामध्ये चार वैवाहिक प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड करून व त्यांना सुखाने संसार करण्याकरीता शुभेच्छा देवून गौरविण्यात आले.  ९० वर्षाच्या वृध्देचे दिवाणी प्रकरणही  यशस्वीपणे तडजोड करण्यात आली.

सदरच्या लोकअदालती दिवशी जिल्हा न्यायाधीश आर. के. मलाबादे व इतर न्यायीक अधिकारी उपस्थित होते.  लोकअदालत यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगलीचे सचिव प्रविण कि. नरडेले, यांनी उपस्थित सर्व मान्यवर अतिथी, न्यायिक अधिकारी, सरकारी वकील, वकील बारचे अध्यक्ष व सदस्य या सर्वाचे आभार मानले.  या लोकअदालतीचे नियोजन जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक व्ही.व्ही. कुलकर्णी, अधिक्षक शुभदा कुलकर्णी, सहाय्यक सचिन नागणे व नितीन आंबेकर  यांनी केले.  लोकअदालतीस पक्षकारांचा सहभाग मोठया प्रमाणामध्ये होता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.