७ ऑगस्ट रोजी भाळवणी येथे झालेल्या महाआरोग्य शिबिरामध्ये
७ ऑगस्ट रोजी भाळवणी येथे झालेल्या महाआरोग्य शिबिरामध्ये भाळवणी पंचक्रोशी मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोफत तपासणीचा लाभ घेतला ..
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉ. बाबासो माळी, डॉ. बालाजी जाधव, डॉ. आनंदा शिंदे, डॉ. संजय चव्हाण, डॉ. मुकुंद निकाळजे, डॉ. सुभाष पवार व डॉ. राहुल माळी यांच्या हस्ते शुभारंभ करून आरोग्य तपासणीला सुरवात केली.
सर्व उपस्थित प्रमुख पाहुण्यांना वरदविनायक सामाजिक संस्थेमार्फत गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. तसेच भाळवणी गावच्या सरपंच, सर्व गावचे राजकीय व सामाजिक मान्यवर, भाळवणी पंचक्रोशी मधील सर्व ग्रामस्थ आणि वरदविनायक सामाजिक संस्थेचे सर्व स्वयंसेवक व स्वयंसेविका या ठिकाणी उपस्थित होते .
या महाआरोग्य शिबिराचा जवळपास ५०० लोकांनी लाभ घेतला असून संस्थेमार्फत लाभार्थींना नाष्ट्याची सोय सुद्धा करण्यात आली . दातांची तपासणी साठी डॉ. अजिंक्य घार्गे, कडेगाव , डोळ्याच्या तपासणी साठी डॉ मिलिंद किल्लेदार यांची टीम आणि पॅथॉलॉजी लॅब तर्फे सौ. प्रियांका राहुल माळी यांनी मोफत सुविधा देऊन आपली सामाजिक बांधीलकी म्हणून खूप मोठे सहकार्य केले.
सर्व उपस्थित मान्यवरांचे, जिल्हा परिषद शाळा भाळवणी, शाळा व्यवस्थापन कमिटी, वैद्यकीय डॉक्टर्स टीम, व सर्व गावातील सर्व ग्रामस्थांचे वरदविनायक सामाजिक संस्थेमार्फत श्री अमोल आनंदराव शिंदे यांनी आभार मानले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.