Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक प्रक्रिया रद्द

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक प्रक्रिया रद्द


कोल्हापूर, दि. 5 : राज्यातील मनपा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाचा राजकीय महत्त्वकांक्षेने पूर्णत: खेळखंडोबा झाला आहे. राज्य सरकारने मनपा सदस्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतल्याने कोल्हापूर महापालिका निवडणुकीची सध्या सुरू असलेली प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. याबाबत अध्यादेश निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे आजवरच्या तयारीवरील लाखो रुपये, अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या मेहनतीवर पूर्णतः पाणी फेरले गेले आहे. अधिकारी या दमनकारी प्रक्रियेने पार वैतागून गेले आहेत. राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या अध्यादेशाने लोकसंख्येनुसार मनपा सदस्य संख्या 81 होईल. दरम्यान, किती सदस्यांचा एक प्रभाग असेल हे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.