Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लग्नात वाजणार 'जीएसटी'चे सनई-चौघडे

 लग्नात वाजणार 'जीएसटी'चे सनई-चौघडे


१० लाखांच्या खर्चातील दीड लाख सरकारला आहेर म्हणून द्या!

नवी दिल्ली, दि. १३ : प्रत्येक जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी वसूल . केला जात असल्यामुळे जनता महागाईच्या खाईत लोटली आहे. विवाह समारंभही जीएसटीच्या कक्षेत आले आहेत. त्यामुळे लग्नाचा खर्च प्रचंड वाढणार आहे. लग्नपत्रिकेपासून हॉल बुकिंग, डेकोरेशनवर कर आकारणी होणार असून, जीएसटी वसुलीचे 'सनई-चौघडे'च आता लग्नात वाजणार आहेत. त्यामुळे हौसेला मोल नसले तरी जीएसटीमुळे खर्चाचा हात आखडता घ्यावा लागेल.

सध्या सणासुदीचे दिवस आहेत. दिवाळीनंतर लग्नाचे मुहूर्त सुरू होतील. तत्पूर्वीच नवरात्र उत्सवानंतर मॅरेज, केटरर्स, तंबू आदींचे बुकिंग सुरू केली जाते. आगाऊ रक्कम देऊन ही बुकिंग होते. उरलेली रक्कम लग्न जवळ आल्यानंतर दिली जाते. आता लग्नासाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तूवर जीएसटी लावला जात असल्यामुळे वधूपित्याची चिंता वाढली आहे. जीएसटीमुळे प्रत्येक वस्तूचे भाव वाढले आहेत. 

असा भरावा लागणार जीएसटी

* ९८ टक्के लग्नपत्रिका, बॅण्डवाजा, घोडा बग्गी, मॅरेज गार्डन, टेंट, लाईटिंग, डेकोरेशन, ब्युटीपार्लर, फोटो, व्हिडीओग्राफी.

* ५ ते १२ टक्के कपडे, पादत्राणे.

* ३ टक्के तीन लाखांचे दागिने खरेदी केल्यास ३ टक्के जीएसटी.

* लग्नावर पाच लाख रुपये खर्च केला तर ७५ हजार रुपये जीएसटी भरावा लागेल. दहा लाखांच्या खर्चावर दीड लाख रुपये जादा खर्च या करापोटी करावा लागणार आहे. सर्वाधिक १८ टक्के जीएसटी मॅरेज गार्डनसह लाइटिंग, बॅण्डबाजावर आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.