वीर सुपुत्रांचे स्मरण करूया-सुरेशराव बुटाले ऑगस्ट क्रांती दिन शांतिनिकेतनमध्ये साजरा..
माधवनगर : देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी भारत छोडो अभियानात सहभागी झालेल्यांचं पुढच्या पीढीनं नेहमी स्मरण करावं, शांतिनिकेतन ही ध्येयाने प्रेरित झालेली आहे म्हणूनच ऑगस्ट क्रांती दिन युवा पिढीसमोर एवढ्या मोठ्या उत्साहात साजरी करते याचा अभिमान आहे. देशभरातल्या सगळ्याच ठिकाणी हा दिन साजरा करून भारत मातेच्या वीर सुपुत्रांचे स्मरण करूया असे मत थोर स्वातंत्र्यसैनिक कै.महादेवराव बुटाले यांचे चिरंजीव सुरेशराव बुटाले यांनी व्यक्त केले.
शांतनिकेतन लोक विद्यापीठात आयोजित केलेल्या ऑगस्ट क्रांती दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात ते प्रमुख म्हणून बोलत होते. प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील, उपसंचालक बी आर थोरात, धनंजय माने, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलतााना म्हणाले की,भारत छोडो या गांधीजींच्या नाऱ्यानंतर संपूर्ण देशातली युवापीढीनं या आंदोलनात स्वत:ला झोकून दिलं. देशवासीयांना दिलेल्या देशातला सामान्य माणूसही देशहितासाठी त्याग करु शकतो. प्राणांचं बलिदान देऊ शकतो. नेतृत्वं करु शकतो, हे नऊ ऑगस्टच्या या ऐतिहासिक क्रांतीदिनानं सिद्ध केलं आहे. सदर कार्यक्रमात अडीच हजार पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी एकाच वेळेला इन्कलाब जिंदाबाद या गाण्याचे सादरीकरण करत देशाप्रती आपली भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एल डी लोहार, पाहुण्यांची ओळख बी एन ननवरे, दिनमहात्मे बाळासाहेब पाटील, सूत्रसंचालन मधुकर कराळे तर आभार शशिकांत जगताप यांनी केले. यावेळी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका समिता पाटील, मुख्याध्यापक संजय खांडेकर,महेश पाटील यांच्यासह विविध शाखेतील मुख्याध्यापक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी- विद्यार्थिनी, पालक आदी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.