Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राकेश झुनझुनवाला यांचं निधन

 राकेश झुनझुनवाला यांचं निधन


मुंबई : शेअर मार्केटमधील बादशाह दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं निधन झालं. बिग बुल नावाने ते प्रसिद्ध होते. त्यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

राकेश झुनझुनवाला गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना काही आठवड्यांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. राकेश झुनझुनवाला यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांनी ब्रिज कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांचं निधन झाल्याची माहिती दिली.

झुनझुनवाला यांना किडनीचा आजार असल्याची माहिती समोर आली आहे. ब्रिज कॅण्डी रुग्णालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राकेश झुनझुनवाला यांना काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थ असल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर डिस्चार्जही देण्यात आला. मात्र पुन्हा आज सकाळी ६ वाजता प्रकृती खालवल्याने ब्रिज कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

डॉक्टारांनी यावेळी त्यांचं निधन झाल्याची माहिती दिली. शेअर मार्केटमध्ये कोणत्या शेअरवर पैसे लावण्याने फायदा होते याचं भाकित राकेश झुनझुनवाला करायचे. त्यांनी दिलेला सल्ला हा योग्य असायचा त्यामुळे अनेकजण त्यांच्या बोलण्याकडे कान लावून असायचे. नवख्या गुंतवणूकदारांना त्यांचा मोठा आधार वाटायचा.

झुनझुनवाला यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे. गुंतवणूकदारांनी हळहळ व्यक्त केली आहे. ट्वीटरवर दिग्गजांपासून गुंतवणूकदारांपर्यंत सगळ्यांनी श्रद्घांजली अर्पण केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.