Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती

महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती 


समितीमहाराष्ट्रातील सर्व नोंदीत बांधकाम कामगारांचे सर्व प्रलंबित  अर्ज दोन महिन्यात निकाली काढण्याचे कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांचे कामगार संघटनांना आश्वासन महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने रविवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी मिरज येथे कामगार मंत्री श्री सुरेशभाऊ खाडे यांना निवेदन देण्यात आले.

शिष्टमंडळाच्या वतीने बोलताना कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की, सध्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांचे महाराष्ट्रामध्ये लाखो अर्ज प्रलंबित आहेत. महाराष्ट्रातील 17 लाखापेक्षा जास्त बांधकाम कामगारांनी कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेली आहे. परंतु कल्याणकारी मंडळाकडून असा आदेश करण्यात आलेला आहे की, जरी मूळ कागदपत्रे देऊन कामगारांनी ऑनलाईन अर्ज केलेला असेल आणि अर्ज मंजूर असला तरी अर्ज केल्यानंतर परत सर्व मूळ कागदपत्रे अधिकाऱ्यांना दाखवणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगारांचे काम ठप्प आहे. ऑनलाईन मध्ये पूर्ण प्रक्रिया करूनही या अटी बांधकाम कामगारांच्यावर अन्याय करणारे आहेत. असे सर्व कामगार संघटना प्रतिनिधींनी मंत्री महोदय यांना सांगितले. 

तसेच अधिकाऱ्यांच्याकडून अर्ज मंजूर करताना अंडरटेकिंग घेतले जात आहे. त्यामुळे  नोंदीत बांधकाम कामगारांची सर्व मूळ कागदपत्रे परत एकदा तपासल्याशिवाय प्रत्यक्ष कामगारांना कोणतेच लाभ मिळणार नाहीत. असे मंडळांनी आदेश केल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व कामकाज ठप्प आहे. विशेषता ऑनलाइन पद्धतीने बांधकाम कामगारांचे कामकाज चालू असेल तर परत मूळ कागदपत्रे मागण्याचा प्रश्न येत नाही. याबाबत कामगार मंत्री श्री सुरेश भाऊ खाडे यांनी आश्वासन दिले की याबाबत एक निश्चित कार्यपद्धती तयार केली जाईल. त्याबाबतची अधिक चर्चा लवकरच कामगार संघटनांच्या बरोबर केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

ज्या कामगारांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या वारसांना व विधवा महिलांना अग्रक्रमाने योजनेमध्ये तरतूद असल्यानुसार आर्थिक सहाय्य देण्यात येईल असेही त्यांनी आश्वासन दिले. शिष्टमंडळामध्ये बांधकाम कामगार संघटना कृती समितीचे निमंत्रक कॉ शंकर पुजारी, कामगार नेते  मिश्रीलाल जाजू, कॉ भर्मा कांबळे, श्री संजय खानविलकर, श्री मदन मुरगुडे, गणेश तडाखे, श्री नितेश दीक्षांत, नजीर बारगीर. संजय कांबळे, मुबारक हकीम, श्री चौगुले व रहिमान पटेल इत्यादींचा होता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.