संजयनगर प्रभाग क्रमांक ११ मध्ये घाणीचे साम्राज्य प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा जीव धोक्यात
संजय नगर प्रभाग क्रमांक ११ मथ्ये अगोदर च डेंग्यू च्या साथीचे थैमान आहे . कित्येक नागरिक आजारी आहेत. पण यांचे प्रशासनाला गांभीर्य नाही. आज राम रहीम काॅलनी मधील नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्यानंतर पाहणी केली. रामरहिम काॅलनी मध्ये गटारी भरुन रस्त्यावर आलेल्या आहेत.
सगळी घाण रस्त्यावर आली आहे. जवळच कर्मवीर भाऊराव पाटील शाळा आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनी व नागरिक या घाण पाण्यातुनच येत जात आहेत. लहान मुले, महिला नागरिक यांच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे. पण याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेच्या मुकादम , स्वच्छता निरीक्षक यांना बोलावून नागरिकांच्या जीवाशी खेळु नका असे सांगून फैलावर घेऊन येथील स्वच्छतेच्या कामाला सुरुवात करावयास लावली .
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.