Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सावधान! नाशिकमध्ये १ कोटींचं

सावधान! नाशिकमध्ये १ कोटींचं 


भेसळयुक्त खाद्यतेल जप्त; एफडीएची मोठी कारवाई


नाशिक :- नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशकात अन्न आणि औषध विभागाने वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत तब्बल १ कोटींचं खाद्यतेल जप्त केलं आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात निकृष्ट आणि भेसळयुक्त दर्जाचे खाद्य तेल जप्त करण्यात आले आहे.पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत ही कारवाई केली आहे.

नाशिकमध्ये उच्च प्रतीचे खाद्यतेल असल्याचं भासवून कमी दर्जाचं तेल ग्राहकांच्या माथी मारलं जात असल्याचा संशय अन्न आणि औषध विभागाला होता. यावेळी त्यांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे. प्राप्त माहितीनुसार, शिंदे गावाजवळच्या माधुरी रिफायनर्स कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाचा छापा टाकला.यावेळी तेलाच्या डब्यांवर फोर्टीफाइड तेलाचा उल्लेख प्रत्यक्षात मात्र पल्स एफ चा सिम्बॉल नसल्याचं समोर आलं आहे. या छाप्यात १ कोटी १० लाख ११ हजार २८० रुपयांच्या खाद्य तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे.खाद्यतेल आणि वनस्पती तुपाचे ३२ नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.

नागरिकांना उत्तम दर्जाचे खाद्य पदार्थ मिळावे यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभाग विविध दुकानांवर छापेमारी करतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी कारवाईचा फास आवळला आहे.नुकतंच एफडीएतर्फे निकृष्ट आणि भेसळयुक्त दर्जाचे खाद्य तेल जप्त करण्यात आले आहे. यावेळी अन्न शिजवण्यासाठी गृहिणी जे तेल वापरतात, त्यातील सुमारे 50 टक्के तेल वापरण्यास योग्य नसून ते भेसळयुक्त होते. अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीत ही गंभीर बाब उघड झाली आहे.

दरम्यान, आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने केलेली ही मोठी कारवाई आहे. खाद्यतेलात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याने सर्वसामान्य जनतेने खाद्यतेल खरेदी करताना सावधानता बाळगावी, असे आवाहन एफडीएतर्फे करण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.