Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

म. गांधी जयंतीदिनी सांगलीत शिक्षण संस्था महामंडळाचे महाधिवेशन खा. सुप्रियाताई सुळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार.. -रावसाहेब पाटील स्वागताध्यक्ष

म. गांधी जयंतीदिनी सांगलीत शिक्षण संस्था महामंडळाचे  महाधिवेशन खा. सुप्रियाताई सुळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार.. -रावसाहेब पाटील स्वागताध्यक्ष


सांगली दि. २४ : महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे राज्यस्तरीय  महाधिवेशन सांगलीत म. गांधी यांच्या जयंतीदिनी दि. २ ऑक्टोबर रोजी खा.सुप्रियाताई सुळे यांच्या अध्यक्षतेखाली भरणार आहे. या अधिवेशनात संबंधित मंत्री व पाचही जिल्ह्य़ातील आमदार व मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे महामंडळाचे कोषाध्यक्ष तथा अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी सांगितले.या अधिवेशनासाठी जाहिरात.. निधी संकलन आणि अधिवेशनातील संस्थांची उपस्थिती या बाबतीत अध्यक्षा खा. सुप्रियाताई सुळे, कार्याध्यक्ष विजय नवल पाटील नाना यांनी अधिवेशनाला जाहिरात व निधीच्या माध्यमातून राज्यातील संस्थाचालकांनी मदत करावी व मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे असून खासगी शिक्षण संस्था, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर अधिवेशनात ठराव संमत करुन मंत्री व लोकप्रतिनिधी यांच्या समोर कैफियत मांडली जाणार आहे.त्यामुळे राज्यातील शिक्षण संस्था चालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही रावसाहेब पाटील यांनी केले आहे. 

आज रावसाहेब पाटील यांच्या दालनात अधिवेशन तयारीबाबत कोल्हापूर विभागीय आढावा  बैठक संपन्न झाली. अधिवेशनात राज्यातील सुमारे चार ते पाच हजार संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून या अधिवेशनात सुवर्ण शिक्षण साधना ही स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार असून जाहिरात व निधी संग्रहाचे नियोजन करण्यात आले.


प्रारंभी कोल्हापूर विभागीय सेक्रेटरी प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी स्वागत करुन मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले.  रावसाहेब पाटील यांनी पुणे येथील बैठकीची माहिती दिली. तसेच अधिवेशन कामकाजासाठी गठीत करण्यात येणाऱ्या विविध समित्यांची माहिती सांगितली. महामंडळाने नियुक्त केलेल्या राज्यस्तरीय वित्त समितीची नावे प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी वाचून दाखवली. 

जाहिरात व निधी संकलन,सोशल मीडियावरुन अधिवेशन प्रचार.. इ. बाबत अशोकराव थोरात यांनी सूचना मांडल्या. अधिवेशन कामकाज सोयीसाठी कोल्हापूर विभागीय मंडळावर उपाध्यक्ष म्हणून संजिवनी नाॅलेज सिटी पन्हाळा या संस्थेचे एन. आर.भोसले, कोषाध्यक्ष म्हणून महाराणी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे चेअरमन व सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे संघटक प्रा. आर. एस. चोपडे, संघटक म्हणून जिल्हा संघाचे मुख्य प्रवक्ता विनोद पाटोळे, विभागीय संचालक म्हणून सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या महानगरपालिका क्षेत्राचे अध्यक्ष प्रा. एम. एस. रजपूत व कोल्हापूरचे श्री. बोराडे यांच्या निवडी करण्यात आल्या व त्यांचे सत्कार करण्यात आले. सांगली शिक्षण संस्थेची निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल चेअरमन नितीन खाडीलकर यांचा सत्कार करण्यात आला. 

दि. १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत जिल्हानिहाय संपर्क साधून जाहिरात व निधी संकलन उद्दिष्ट पूर्ण करावे असे आवाहन रावसाहेब पाटील व अशोकराव थोरात यांनी केले. या बैठकीस लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सुहास पाटील, शिवाजी माळकर, एस. टी. सुकरे, प्रशांत चव्हाण, संजय यादव, हरिदास शिंदे, एन. जे. पाटील, कराडचे थोरात, प्राचार्य एस. के. पाटील, प्रा. शिवपुत्र आरबोळे व संस्था चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.