Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मंगलप्रभात लोढा यांची विरोधकांना विनंती

मंगलप्रभात लोढा यांची विरोधकांना विनंती


मी नवखा, मला ओपनिंगला पाठवले आहे, बाऊन्सर टाकू नका!

विधान परिषदेत तारांकित प्रश्नावेळी भाजपचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर विरोधकांनी प्रश्नांचा भडिमार केला. त्यामुळे भांबावलेल्या लोढा यांनी मी नवखा आहे. मला ओपनिंगला पाठवले आहे. त्यामुळे माझ्यावर बाऊन्सर टाकू नका, अशी काकुळतीची विनंती लोढा यांनी विरोधकांना केली.

मंगलप्रभात लोढा यांच्याकडे पर्यटनाबरोबर काwशल्यविकास व उद्योजकता खाते असून त्यांना कामगार विभागाशी निगडित विविध प्रश्न विचारण्यात आल्याने ते पुरते गोंधळून गेले. उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी दोन्ही विभागांची बैठक घेऊन त्याबाबतचे प्रश्न निकाली काढण्याची सूचना केली. दहापेक्षा अधिक कर्मचारी काम करीत असलेल्या खासगी आस्थापनांनी राज्याच्या कौशल्य विकास विभागाच्या पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक असतानाही अनेक आस्थापना खासगी एजन्सीकडून मनुष्यबळ मागवत असल्याने सरकारकडे नोंदणी केलेल्या बेरोजगारांना संधी मिळत नाही, याबाबतचा प्रश्न अभिजीत वंजारी यांनी उपस्थित केला होता.

माहीत नाही, माहिती घेतो!

विरोधकांनी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता, बेरोजगार भत्ता, सरकारचे धोरण अशा एकामागोमाग प्रश्न केले. सर्व प्रश्न हे कौशल्य विकास आणि कामगार खात्याशी संबंधित होते. त्यामुळे त्यावर नेमके काय उत्तर द्यावे, हे लोढा यांना समजत नव्हते. त्यामुळे याची माझ्याकडे पुरेशी माहिती नाही, माहिती घेतो आणि नंतर पटलासमोर ठेवतो, अशी विनंती त्यांनी विरोधकांना केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.