Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या बालकांची शोध मोहिम राबवा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या बालकांची शोध मोहिम राबवा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी


सांगली, दि. 26,  :  कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत पालकत्व गमावलेल्या बालकांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ देण्यात आले आहेत. तथापी यानंतरही कोरोनाची साथ अजूनही सुरूच असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या बालकांची शोध घेण्याची मोहिम राबविण्यात यावी. यासाठी आरोग्य विभागाकडून सर्वोतोपरी माहिती उपलब्ध करून घेवून शहरी व ग्रामीण भागात शोध मोहिम घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दल आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी विधी व न्याय प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती प्रविण नरडेले, महापालिका उपायुक्त राहूल रोकडे, कौशल्य विकास चे सहायक आयुक्त जमीर करीम, महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार तसेच समिती सदस्य उपस्थित होते.

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचे पालकत्व प्रतिपालकांच्याकडे देण्यात आले आहे, अशा बालकांशी संपर्क साधून त्यांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात. शासनाकडून मिळणारी मदत त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेनंतरही कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. अशा कुटुंबांचा शोध घेवून या कुटुंबामध्ये मृत्यू पडलेल्या व्यक्तींच्या पाल्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावा. शासनाच्या विविध योजनांचा 2 हजार 212 पात्र लाभार्थ्यांपैकी 1 हजार 120 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी यावेळी दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.