Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आटपाडीत सामुदायिक राष्ट्रगीताच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद माजी सैनिक, वीर माता, वीर पत्नी यांचा केला सन्मान

आटपाडीत सामुदायिक राष्ट्रगीताच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद माजी सैनिक, वीर माता, वीर पत्नी यांचा केला सन्मान


सांगली, दि. 9,  : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत आटपाडी तालुका प्रशासनाच्या वतीने  सामुदायिक राष्ट्रगीत कार्यक्रम श्री भवानी हायस्कूल आटपाडी च्या पटांगणावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सुमारे ४ हजार ५०० विद्यार्थी, शिक्षक, शासकीय अधिकारी व कर्मचारी, नागरिकांनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, तहसिलदार बी. ए. माने, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सैनिक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विध्यार्थ्यांनी देशाचा ध्वज साकारला. केशरी, पांढरा व हिरवा रंगामध्ये राष्ट्रध्वज साकारला. देशाच्या नकाशामध्ये अशोक चक्र साकारले. हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारा ठरला.

तसेच श्रीमती वत्सलादेवी देसाई मुलींची शाळा येथील सभागृहात आटपाडी तालुका प्रशासनाच्या वतीने आटपाडी तालुक्यातील एकूण 10 माजी सैनिक, वीर माता, वीर पत्नी यांचा शाल, श्रीफळ आणि भारताचा राष्ट्रध्वज देऊन सत्कार करण्यात आला. तसेच देशभक्तीपर कार्यक्रमास शाळेतील 300 विद्यार्थिनी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.