महापालिकेच्या आयुक्त पदी सुनील पवार यांची नियुक्ती : आज नूतन आयुक्त पदभार स्वीकारणार
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी सुनील पवार यांची राज्य शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. सुनील पवार यांच्या नियुक्तीचा आदेश गुरुवारी दुपारी महापालिकेला प्राप्त झाला. सुनील पवार हे कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत आहेत .
शासनाच्या आदेशानुसार नूतन आयुक्त सुनील पवार हे शुक्रवारी सकाळी 10 वाजता आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत अशी माहिती उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिली. सुनील पवार यांनी यापूर्वी 2015 ते 2018 या कालावधीत सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे उपायुक्त म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
उपायुक्त पदाच्या कार्यकाळात त्यांनी स्वच्छ भारत अभियान यशस्वीपणे राबविले होते. याचबरोबर महापालिकेच्या सर्व शिक्षा अभियानात उल्लेखनीय कामगिरी करत प्राथमिक शाळा सुधारनेबरोबर, आरोग्य केंद्र सुसज्ज करण्यासाठी भरीव कामगिरी केली होती. शुक्रवारी सकाळी 10 वाजता सुनील पवार हे मनपा मुख्यालयातील आयुक्त दालनात आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.